कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सध्या रंगतदार वळणावर आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक बालकलाकार त्यांच्यातील कला उत्तमरित्या सादर करत आहेत. त्यामुळे या लहानग्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अनेक वेळा कार्यक्रमाच्या सेटवर प्रमुख पाहुणे म्हणून दिग्गज कलाकार, चित्रपट-नाटकाची टीम हजेरी लावत असते. त्यातच या आठवड्यामध्ये बहुचर्चित ठरत असलेला रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली आहे. मात्र या सेटवर रितेश अचानकपणे रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कार्यक्रमामध्ये छोट्या सुरविरांनी एका पेक्षा एक गाणी सादर करून माऊली टीम आणि कॅप्टन्सला खुश केले. मात्र एका गाण्यामुळे रितेश देशमुख आणि सिद्धार्थ जाधव अचानकपणे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मीराने ‘बाबा थांब ना रे’ हे गाणं मंचावर सादर केलं. हे गाणं ऐकताच रितेश आणि सिद्धार्थच्या डोळ्यात अश्रू तरळले.

मीराचं गाणं ऐकल्यानंतर रितेशने वडील विलासराव देशमुख यांच्या काही आठवणी यावेळी सांगितल्या. त्यामुळे उपस्थित सारेच भावूक झाले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा बालकलाकारांनी त्यांच्या मस्तीने आणि गोड आवाजाने हे वातावरण बदलून टाकलं.

दरम्यान, माऊलीच्या निमित्ताने सूर नवा..च्या सेटवर वारकऱ्यांनादेखील बोलाविण्यात आलं होतं.त्यामुळे हा शो आणखीनच रंगतदार झाला. त्यातच या कार्यक्रमाची शान असलेला लहानगा हर्षद नायबळने ‘माऊली’ची भूमिका वठवत विटांची भिंत तोडून धमाकेदार एण्ट्री केली. इतकंच नाही तर त्याने या चित्रपटातील काही संवाददेखील म्हणून दाखविले. हा विशेष भाग १० ते १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.