Suraj Chavan Video : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणणे लाखो चाहत्यांच्या मनात स्वत:चं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सूरजच्या साध्या भोळ्या स्वभावावर महाराष्ट्रातील जनतेने भरभरून प्रेम केलं आहे. बिग बॉसची ट्रॉफी त्याने जिंकल्यावर प्रत्येक व्यक्तीने आणि सामान्य माणसाने जल्लोष केला. त्यानंतर आता सूरजला पाहण्यासाठी त्याला भेटण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. सूरजला अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केलं जात आहे. त्याने आतापर्यंत अनेक शाळांनाही भेट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरजने गुलीगत रील व्हिडीओ बनवून मोठी प्रसिद्धी मिळवली. काही दिवसांपूर्वीच त्याने एका शाळेला भेट दिली होती. त्यावेळी त्याला पाहून शाळेतील विद्यार्थ्यांनी सूरज…सूरज असं म्हणत एकच कल्ला केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

हेही वाचा : Bigg Boss 18 मध्ये पुन्हा शारिरीक हिंसा, अविनाश मिश्रा-रजत दलाल दिग्विजय राठीच्या अंगावर धावून गेले अन्…; नेमकं काय घडलं?

लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या मनात सूरजविषयी आदर आणि सन्मान निर्माण झाला आहे. त्याच्या निरागस स्वभावानं चाहते त्याच्यावर भरभरून प्रेम करीत आहेत. अशात सध्या सोशल मीडियावर सूरजच्या एका चाहतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका शाळेतील विद्यार्थिनी सूरजला भेटण्यासाठी आली आहे.

सूरज आपल्या शाळेच्या आसपास असल्याचं समजताच त्याला एकदा तरी भेटता यावं, त्याला पाहता यावं, असं तिला तीव्रतेनं वाटू लागलं. त्यानंतर मोठी धडपड करीत ती सूरजजवळ आली आणि त्याला पाहताच तिच्या आनंदाश्रूंचा बांध कोसळला. सूरजला पाहून ही लहानगी विद्यार्थिनी रडू लागली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रडता रडता ती सूरजला म्हणते, “आज मी कुणाचं तरी स्टेटस पाहिलं आणि मला कळलं की, तू इथे आला आहेस. मग मला तुला फार भेटावंसं वाटलं. मी इकडे आले, तर माझी एक मैत्रीण मला म्हणाली की, तू घरी जात आहेस आणि मग तुला भेटायला आले.”

चाहतीला रडताना पाहून सूरजनं तिला जवळ घेत शांत केलं आणि “तुला भेटायचं होतं, तर यायचं ना मग”, असं म्हणत तिला शांत केलं. चाहत्यांच्या मनात सूरजविषयीचं प्रेम किती जास्त आहे, हे या विद्यार्थिनीच्या व्हिडीओतून समजत आहे.

हेही वाचा : २००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट, तब्बल २५ वर्षांनी मुंबईला परतली मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री; शेअर केला भावुक व्हिडीओ

सूरजनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्याच्या व्हिडीओवर नेटकरी आणि चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “”भावा.. जिंकलो आपण… लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत, सर्वांना हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व…”, “भावा, आतापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणलंस, सगळ्यांना हसवलंस; पण भावा, आयुष्यात तू काय कमवलं आहेस ना तर ही गोष्ट… अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांचं तू मन जिंकलं आहेस,” अशा कमेंट्स आल्या आहेत. तर आणखी एकानं “लोकांच्या काळजाचा तुकडा आहेस भावा तू फक्त सूरजदादा…”, असंही कमेंटमध्ये लिहिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj chavan fan school students emotional after meeting suraj chavan rsj