जिया खान आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर सूरज पांचोली याला सोमवारी संध्याकाळी अटक केली. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. जिया खानने लिहिलेल्या पत्रामुळे सूरजने केलेल्या छळामुळेच तिने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाल्याने सूरजला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. सूरज आपल्यावर बलात्कार करत होता, तसेच दररोज शारीरिक व मानसिक छळ करत होता, असे जियाने या पत्रात म्हटले आहे.
आत्महत्येच्या दिवशी सूरज जियाशी बोलला होता. त्यामुळे पोलिसांनी सूरजची जबानी घेतली होती. परंतु शनिवारी जियाची आई राबिया हिला जियाने लिहिलेले पत्र सापडले. हे पत्र तिने पोलिसांकडे सुपूर्द केले आणि ‘ट्विटरवर’ही टाकले. सूरजने आपले आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, असे जियाने पत्रात म्हटले आहे.
सूरजच जियाच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप राबिया तसेच जियाची बहीण कविता यांनी केला होता. सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांनी जियाच्या घरी जाऊन राबियाचा जबाब नोंदविला होता. यानंतर संध्याकाळी सूरजला अटक केली. आत्हत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. सूरज आपल्यावर बलात्कार करीत होता, तसेच तो दररोज छळत असे. त्याने आपली फसवणूक केली जियाने पत्रात म्हटले आहे. यामुळे सूरजवर आणखी गुन्हे दाखल करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
काय होते हे पत्र
इंग्रजीत लिहिलेल्या या सहा पानी पत्रात जियाने आपले आयुष्य सूरजने कसे उद्ध्वस्त केले ते तपशीलवार लिहिले आहे. या पत्राचा आशय थोडक्यात असा-
मी तुला प्रेम दिले पण तू माझी फसवणूकच करत गेलास. तुझ्यामुळे मला सतत गर्भवती राहण्याची भीती वाटायची. तुझ्यामुळेच मी गर्भपात केला होता. मी आतून कोलमडले होते. तू सतत माझ्यावर बलात्कार करत राहिलास. तू भेटण्यापूर्वी मी महत्त्वाकांक्षी होते. तुझ्या प्रेमात माझे करियरही उद्ध्वस्त झाले. मी फक्त तुझा विचार करत होते. तू नेहमी इतर मुलींमध्ये राहिलास आणि माझी फसवणूक करत गेलास. माझ्या आयुष्यातला प्रकाश तू हिरावून घेतलास. नशिबाने आपल्याला का भेटवलं, असा मला वाटतंय. तू प्रत्येक दिवस माझा छळ करत राहिलास. तुझ्यामुळे माझा कोंडमारा झाला आणि मी उद्ध्वस्त होत गेले. हे पत्र जेव्हा तू वाचशील तेव्हा मी या जगात नसेन. माझ्या प्रेमाची तू अहवेलना केलीस पण माझ्याएवढे प्रेम तुझ्यावर कुणी करणार नाही.
जिया खान आत्महत्या प्रकरण : प्रियकर सुरज पांचोलीस अटक
जिया खान आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर सूरज पांचोली याला सोमवारी संध्याकाळी अटक केली. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. जिया खानने लिहिलेल्या पत्रामुळे सूरजने केलेल्या छळामुळेच तिने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाल्याने सूरजला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. सूरज आपल्यावर बलात्कार करत होता,
First published on: 11-06-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj pancholi arrested for abetting actress jiah khans suicide