प्रसिद्ध गायक सुरेश वाडेकर यांचा आज वाढदिवस आहे. ते आज आपला ६६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ७ ऑगस्ट १९५५ रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. त्यांच्या कुटुंबाने त्यांना साथ दिली आणि नंतर ते बॉलिवूडचे लोकप्रिय गायक झाले. आजा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक खास गोष्ट जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे म्हटले जाते की, सुरेश वाडकर यांना माधुरीशी लग्न करण्याची मागणी तिच्या कुटुंबाने घातली होती. माधुरीच्या लग्नाचा जेव्हा तिच्या घरातले विचार करत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर सुरेश वाडकर यांचं नाव आलं होतं. याबद्दल वाडकरांना विचारण्यातही आलं होतं. पण त्यांनी माधुरीचं आलेलं स्थळ स्पष्टपणे नाकारलं. माधुरीचं घर पारंपरिक विचारांचं असल्यामुळे त्यांना माधुरीने चित्रपटांमध्ये काम करणं फारसं पसंत नव्हतं. त्यामुळेच खूप आधीपासून तिचे वडील तिच्यासाठी स्थळं शोधत होते. वराच्या शोधात माधुरीचे वडील सुरेश वाडकरांकडे तिचं स्थळ घेऊन गेले.

आणखी वाचा : ‘दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध आणि…’, नर्गिस फाखीरने केला धक्कादायक खुलासा

जेव्हा माधुरीचे वडील वाडकरांकडे त्यांच्या मुलीचे स्थळ घेऊन गेले होते तेव्हा तेही संगीतसृष्टीत आपला जम बसवत होते. माधुरीच्या आणि वाडकर यांच्या वयात १२ वर्षांचा फरक होता. त्यावेळी वाडकरांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव मुलगी खूपच बारीक असल्याचे कारण देत फेटाळला होता. या नकारामुळे माधुरीच्या आई- वडिलांना फार दुःख झाले. पण, त्यानंतर माधुरीला चित्रपटामध्ये काम करण्याची परवानगी मिळाली. या घटनेनंतर अनेकदा माधुरीच्या चित्रपटांसाठी सुरेश वाडकरांनी पार्श्वगायनही केलं.

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील ‘या’ आलिशान रेस्टॉरंटमध्ये असते बॉलिवूड कलाकारांची रेलचेल!

या सर्व घटनेनंतर माधुरीने १९८४मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून पुन्हा पदार्पण केले. १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीने लग्न करून परदेशात संसार थाटला. माधुरीला दोन मुलगे असून, ती संसारात रमली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh wadkar birthday today this is why he refused to marry madhur dixit dcp