Kanguva Trailer : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा ( Suriya ) बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘कंगुवा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘कंगुवा’ चित्रपटाची घोषणा झाल्यामुळे याची चर्चा रंगली आहे. जेव्हा पहिल्यांदा चित्रपटातील कलाकारांचा लूक निर्मात्यांनी प्रदर्शित केला होता. तेव्हापासून ‘कंगुवा’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली. त्यानंतर आता चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेले प्रसिद्ध दिग्दर्शक शिव यांनी ‘कंगुवा’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सूर्यासह ( Suriya ) अभिनेता बॉबी देओल आणि अभिनेत्री दिशा पटाणी प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. याशिवाय नटराजन सुब्रमण्यम, जगपति बाबू, योगी बाबू, रेडिन किंग्सले, कोवई सरला, आनंदराज, रवि राघवेंद्र अशा अनेक तगड्या कलाकार मंडळींनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत काम केलं आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा – इब्राहिम अलीबरोबर लेकीच्या अफेअरच्या चर्चांवर श्वेता तिवारीने सोडलं मौन, म्हणाली, “पलक आता…”

सूर्याने ( Suriya ) सोशल मीडियावर ‘कंगुवा’चा ट्रेलर शेअर केला आहे. “आम्ही एकजुटीने जे काही काम केलं आहे, त्याचा खूप अभिमान आहे. धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिव.” ‘कंगुवा’च्या ट्रेलरची सुरुवात आदिवासी लोकांपासून झाली आहे. हे आदिवासी लोक बॉबी देओलबरोबर युद्ध करण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत. सूर्या व्यक्तिरेखा साहसी दाखवण्यात आली आहे. तर बॉबी देओलच्या खतरनाक लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक डोळा असलेल्या बॉबीचा लूक पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

हेही वाचा – “मला बिग बॉसच्या घरात…”, पहिल्याच आठवड्यात बेघर झालेले पुरुषोत्तमदादा पाटील यांची भावुक पोस्ट, म्हणाले…

‘कंगुवा’ चित्रपट ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार

सूर्या ( Suriya ) , बॉबी देओल आणि दिशा पटाणीचा ‘कंगुवा’ चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. ‘कंगुवा’ची कथा एका योद्ध्याची आहे, जो आपल्या वंशाला वाचवण्यासाठी एका हैवानाचा सामना करतो. चित्रपटाची कथा १७०० ते २०२३ या दोन वेगवेगळ्या कालखंडावर आहे. माहितीनुसार, यावर्षात सर्वात बिग बजेट चित्रपट ‘कंगुवा’ आहे. या चित्रपटासाठी जवळपास ३५० कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘पुष्पा’ आणि ‘सिंघम’पेक्षा बिग बजेट असलेला ‘कंगुवा’ चित्रपट आहे. एवढंच नव्हे तर चित्रपटाचं चित्रीकरण सात वेगवेगळ्या देशांमध्ये झालं आहे. अ‍ॅक्शन सीनसाठी १० हजार लोकांचा वापर केला आहे. अ‍ॅक्शन आणि सिनेमेटॉग्राफीसाठी हॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांची मदत घेण्यात आली होती. ‘कंगुवा’ ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये भारतातील स्थानिक भाषांसह जगभरातील ३८ भाषांचा समावेश आहे.

Story img Loader