का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) आणि अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade) या दोघांचा विवाहसोहळा ६ डिसेंबर २०२३ रोजी थाटामाटात पार पडला. लग्नानंतर या जोडप्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुरुची-पियुषच्या लग्नाला कलाविश्वातील त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात.

अशातच आज अभिनेता पियुष रानडेचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर कलाविश्वातून अनेक कलाकारांकडून् शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसंच त्याच्या अनेक चाहत्यांनीही त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. अशातच पियुषची पत्नी सुरुची अडारकरने त्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

सुरुचीने पियुषबरोबरचा खास फोटो शेअर करत त्याला असं म्हटलं आहे की, “माझा प्रिय, माझे सर्वस्व…. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू अद्भुत आहेस. मी सर्वस्वी धन्य आहेस. तू जे काही करतोस आणि तू एक अविश्वसनीय व्यक्ती आहेस त्यासाठी मी आभारी आहे. माझा सर्वात चांगला मित्र, माझा प्रवासाचा साथीदार, माझा सर्वात मोठा आधार, माझा कणा, आयुष्यातील सर्व साहसी क्षणांमध्ये तू माझ्याबरोबर आहेस आणि याबद्दल मी भाग्यवान आहे”.

यापुढे तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “तुझ्या वाढदिवसानिमित्त फक्त एवढेच म्हणायचे आहे की, तुझ्यातील मुलाला नेहमीच जिवंत ठेव, कारण तेच मला तुझ्याबद्दल सर्वात जास्त तेच आवडतं. तू जो काही आहेस त्यासाठी मी तुला प्रेम करते. माझ्या मौल्यवान संपत्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे”. सुरूची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुरूची-पियुषच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी या फोटोच्या कमेंट्समध्ये पियुषला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, सुरुचीने शेअर केलेल्या या फोटोमदये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. दोघांच्या आयुष्यातील काही खास क्षणांची झलक या फोटोमधून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सुरुची-पियुष यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सुरूची सध्या सुयश टिळकबरोबरच्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ असं या नाटकाचं नांव आहे. या नाटकात सुरुची, सुयश यांच्याबरोबरच अभिनेत्री शर्मिला शिंदेही मुख्य भूमिकेत आहेत. तर पियुष सन मराठीवरील ‘आदिशक्ती’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.