‘झी मराठी’वरच्या ‘का रे दुरावा’ मालिकेतील आदिती आता ‘झी युवा’ वाहिनीवर नव्या मालिकेत ‘डॉ. अंजली’च्या भूमिकेत दिसणार आहे. ‘का रे दुरावा’च्या अदितीच्या व्यक्तिरेखेनंतर प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा राज्य करायला मी सज्ज झाले आहे. या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेच नाव अंजली आहे. आधीची आदिती आणि आताची अंजली पुन्हा “अ’ हेच अक्षर माझी ओळख प्रेक्षकांना करून देणार आहे, अशा शब्दांता सुरुचीने या नव्या मालिकेतील भूमिकेबद्दल आपला आनंद व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी युवा’वर येत्या सोमवारपासून ‘अंजली’ ही नविन मालिका रात्री आठ वाजता दाखवण्यात येणार आहे. हॉस्पिटलच्या कारभारावर भाष्य करणाऱ्या या मालिकेत कलाकारांना डॉक्टरांचे देहबोली, त्यांच्या कामाची पध्दत याचे प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रख्यात डॉक्टर सेटवर येत होते. त्यांनी डॉक्टर पेशंटशी कसे बोलतात, ऑपरेशन करत असताना डॉक्टरच्या चेहऱ्यावर कसे भाव असतात, इंटर्नशिप करणाऱ्या मुलींचे हॉस्पिटलमधले वागणे, आजारी व्यक्तींशी त्यांची बोलण्याची पध्दत, त्या त्यांची कशी काळजी घेतात हे सर्व प्रशिक्षण डॉक्टरांनी मालिकेतील कलाकारांना दिले. त्यांनी दिलेल्या सूचनांटे तंतोतंत पालन करून आपण डॉ. अंजली साकारणार आहोत, असे सुरूचीने सांगितले. हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी ‘अंजली’ ही मराठीतील पहिलीच मालिका आहे. अंजली कश्या प्रकारे या हॉस्पिटलमध्ये तिची इंटर्नशिप ते डॉक्टर हा प्रवास पूर्ण करते हे पाहणे प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suruchi adarkar starring anjali role in new upcoming serial on zee yuva