‘#MeToo’ चळवळीनंतर हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी चित्रपट मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागल्याची जाहीर कबुली देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी सुद्धा आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. परंतु आजही ‘कास्टिंग काऊच’चा प्रकार आजही सर्रास सुरू आहे. काही काळापूर्वी विद्या बालन, जरीन खान या अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाचं कथन केलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्री सुरवीन चावलानेदेखील एक मोठा आणि तितकाच धक्कादायक खुलासा केला आहे. सुरवीन पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाल्याचं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सुरवीन चावला एकदा नाही तर तब्बल पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाली आहे. एका वेबसाइटला दिलेलल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर चर्चा केली. सोबतच करिअरमध्ये आलेल्या काही अनुभवांचंही कथन केलं. ‘मी एकदा नाही तर तब्बल पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाले आहे. एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने माझ्या शरीराचा एक एक इंच पाहण्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर अनेकांनी माझ्या वजनामुळे सुद्धा मला ना ना प्रकारचे प्रश्न विचारले होते’, असं सुरवीन म्हणाली.

पुढे ती सांगते, ‘बॉलिवूडमधील दोन दिग्दर्शकांनी तर चक्क मला अंगप्रदर्शन करण्यास सांगितलं होतं. हा प्रकार माझ्यासाठी प्रचंड मनस्ताप देणारा होता.’ सुरवीनने ‘पार्च्ड’, ‘अगली’ आणि ‘हेट स्टोरी २’ सिनेमांत काम केले आहे. तिने अनेक लघुपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surveen chawla recalls casting couch experiences ssj