अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी अद्यापही पोलिसांचा तपास सुरू आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडसह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. दोन वर्षे उलटून गेल्यानंतर सुशांतच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. सुशांतची आत्महत्या ही हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर आजही त्याच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी सीबीआय चौकशी सुरु आहे. दरम्यान सुशांतच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्याची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

श्वेता सिंह किर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुशांतचा एक फार छान फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुशांत हा एका गरजू मुलासोबत काहीतरी गप्पा मारताना दिसत आहे. त्याला कॅप्शन देताना श्वेता ही भावूक झाली.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
This advice was given to Nivedita saraf by Ashok Saraf for the serial Aai Aani Baba Retire Hot Aahet
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेसाठी अशोक सराफांनी निवेदिता यांना दिला होता ‘हा’ सल्ला; काय म्हणाले? वाचा…

“मी सिद्धार्थच्या प्रेमात पडले कारण…”, वाढदिवसानिमित्त मितालीने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

“भाऊ, तुझ्या निधनाला आज २ वर्षे पूर्ण झाली, पण तू ज्या मूल्यांसाठी उभे राहिलात, त्यासाठी तू अमर झालास. विनम्रता, करुणा आणि प्रेम ही तुमची ताकद होती. तुम्हाला सर्व लोकांसाठी खूप काही करायचे होते. तुमच्या सन्मानार्थ आम्ही तुझे ते गुण आणि आदर्श पाळत राहू. भाऊ तुम्ही जग चांगल्यासाठी बदलले आहे आणि तुझ्या अनुपस्थितीतही आम्ही त्या आदर्शांचे पालन करत राहू. त्यामुळे आज आपण सर्वांनी मिळून दिवा लावूया आणि निस्वार्थ भावनेने कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणूया”, असे ती म्हणाली.

बॅकग्राऊंड डान्सर ते प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतविषयी ‘या’ खास १५ गोष्टी

दरम्यान १४ जून २०२० या दिवशी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण देश हादरून गेला. सुशांतने १४ जून २०२० सालामध्ये वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंर मुंबई पोलिसांनी सुशांतच घर गाठत तपास सुरु केला. सुशांतच्या घरात अशी काही औषधं सापडली ज्यामुळे सुशांत नैराश्यात होता असा अंदाज लावण्यात आला. तर नैराश्य हेच सुशांतच्या आत्महत्येचं कारण असल्याचा कयास पोलिसांनी बांधला.

यानंतर १५ जूनला सुशांतचं संपूर्ण कुटुंब मुंबईत दाखल झाल. तर सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीने रुग्णालयात जाऊन त्याचं अंतिम दर्शन घेतलं. मुसळधार पावसात विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत सुशांतवर अत्यंसंस्कार पार पडले.

Story img Loader