sushant-ankita-450‘काय पो चे’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या सुशांत सिंग राजपूतने त्याची दीर्घकाळची मैत्रीण अंकिता लोखंडेबरोबर बुधवारी त्याचा वाढदिवस साजरा केला. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित ‘पीके’ चित्रपटात दिसलेल्या सुशांतने टि्वटरवरून चाहत्यांचे आणि सहकाऱ्यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आभार मानले. अंकिताबरोबर वाढदिवस साजरा करतानाची छायाचित्रेदेखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. चित्रपटकर्ता शेखर कपूर यांच्या ‘पानी’ या आगामी चित्रपटात सुशांत दिसणार आहे. सुशांतचा एक उत्तम अभिनेता असा उल्लेख करीत शेखर कपूरनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुजॉय घोषनेदेखील सुशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’नंतर सुशांत ‘एमएस धोनी’च्या जीवनावर आधारीत चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
sushant-singh-rajput-embed-

Story img Loader