‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील जोडी सुशांत सिंग राजपूत याने अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्याची अखेर कबुली दिली आहे. गेल्या सहा वर्षांपासून हे दोघेही ‘लिव्ह इर रिलेशनशिप’मध्ये एकत्र राहात होते. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये त्यांच्या ब्रेकअपबद्दल चर्चा सुरू होती. पण दोघांकडून त्याबद्दल काहीही सांगण्यात येत नव्हते. अखेर ट्विटरच्या माध्यमातून सुशांत सिंग राजपूतने आपले या विषयावरील मौन सोडले.
ट्विटमध्ये तो म्हणतो,
Neither she was an alcoholic nor I am a womaniser . People do Grow apart & its unfortunate . Period!!
— Sushant S Rajput (@itsSSR) May 4, 2016
या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्येच सुशांत सिंग राजपूतने या वर्षाच्या अखेरिस आपण अंकिता लोखंडेसोबत विवाह करणार असल्याचे म्हटले होते. पण त्यानंतर या दोघांमध्ये दुरावा निर्माण होत गेला आणि अखेर दोघांमध्ये ब्रेकअप झाले. यापूर्वी अंकिताला पत्रकारांनी याबद्दल विचारल्यावर तिने कायम त्याचा इन्कारच केला होता.
भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या चरित्रावर आधारित M.S. Dhoni: The Untold Story या चित्रपटात सुशांत भूमिक साकारणार आहे.