‘काय पो छे’ चित्रपटाने प्रसिद्ध झालेला सुशांत सिंह राजपूत प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सुशांतचे गेल्या चार वर्षांपासून टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत प्रेमसंबंध आहेत. या दोघांनीही ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत पती-पत्नीची भूमिका केली होती. तेथेच त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती.
सुशांत म्हणाला की, आम्ही खूप खूश आहोत. आमचे लग्न केव्हाही, यावर्षी किंवा पुढच्यावर्षी होऊ शकते. अंकिता माझ्या जीवनातील स्थिरतेचे कारण असून तिने नेहमीच मला साथ दिली आहे. तिच्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला आहे आणि जेव्हा काहीही अडचण असते तेव्हा ती मला सांभाळून घेते. ती माझ्या चित्रपटांबाबत फार जागरुक असून त्याबाबत ती मला मार्गदर्शन करते, असेही तो म्हणाला.
सुशांतकडे सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. यात आदित्य चोप्राचा ‘शुद्ध देसी रोमान्स’, आमिर खान अभिनीत ‘पीके’ आणि दिबाकर बॅनर्जीचा ‘डिटेक्टीव ब्योमकेश बख्शी’ यांचा समावेश आहे.

Story img Loader