अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘काय पो चे’ या चित्रपटामुळे सुशांत सिंग राजपूत हा छोटय़ा पडद्यावरचा चेहरा मोठय़ा पडद्यावर लोकप्रिय झाला. सुशांतला घडवणारा दिग्दर्शक म्हणूनच अभिषेककडे पाहिले जाते. त्यामुळे सुशांतच्या बाबतीत अभिषेक थोडा आग्रही झाला होता. आपल्या ‘फितूर’ या चित्रपटासाठी अभिषेकने सुशांतचे नाव निश्चित केले होते. मध्यंतरी, सुशांतने निवडलेल्या चित्रपटांबद्दल अभिषेकने जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. तेव्हा सुशांतने आपण अभिषेकचा चित्रपट करणारच, असे आश्वासन दिले होते. पण, एवढी सगळी गरमागरमी होऊनही अखेर सुशांतला ‘फितूर’ सोडावा लागला आहे.
‘काय पो चे’मुळे सुशांतला अमाप लोकप्रियता मिळाली आहे आणि एकापाठोपाठ एक चित्रपट त्याच्याकडे येत असल्याने त्याला अभिषेकचा चित्रपट करायलाच वेळ नसल्याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला जोर चढताच अभिषेकनेही सुशांतच्या चित्रपट निवडीवर नाराजी व्यक्त केली. पण, सुशांतने मात्र आपण अभिषेकचा चित्रपट सोडलेला नाही आणि काहीही झाले तरी आपण तो चित्रपट करणारच असे जाहीर के ले होते. एवढेच नाही तर सुशांतने या ऑक्टोबरच्या तारखाही चित्रिकरणासाठी दिल्या होत्या.
पण, यावेळी अभिषेकचे प्रयत्न कमी पडले. काही कारणांमुळे अभिषेकला ‘फितूर’चे चित्रिकरण मार्च २०१४ पर्यंत आणि मग अगदी जुलैपर्यंत पुढे ढकलावे लागले. सुशांतने पुढच्या वर्षीच्या तारखा शेखर कपूर दिग्दर्शित ‘पानी’ या चित्रपटासाठी दिल्या आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी ‘फितूर’साठी त्याला त्या तारखांमध्ये बदल करता येणे शक्य नाही. अखेर सुशांतला ‘फितूर’वर पाणी सोडावे लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा