बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या घरात सुशांतचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूला इतका काळ उलटला असला तरी अद्याप त्याचे कुटुंबिय या धक्क्यातून सावरलेले नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती ही तिच्या भावाच्या आठवणीत भावकू झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नववर्षाच्या निमित्ताने तिने सुशांतच्या अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आता नवीन वर्षाच्या निमित्ताने सुशांतच्या फेसबुक अकाऊंटवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट पाहून सुशांतचे चाहते आश्चर्यचकित झाले. खरंतर ही पोस्ट सुशांतची मोठी बहीण श्वेता सिंग कीर्तीने लिहिली होती. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती ही नेहमी त्याच्या आठवणीत विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नवीन वर्षाच्या निमित्ताने तिने सुशांतच्या फेसबुक अकाऊंटवरुन चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुशांतच्या अकाऊंटवरील ही पोस्ट पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सध्या ही पोस्ट प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
सुशांतच्या वतीने त्याच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना श्वेता म्हणाली, “सर्वांना नवीन वर्षासाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. मी श्वेता सिंह किर्ती माझ्या भावाच्या वतीने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते.”
दरम्यान सुशांतच्या अकाऊंटवरील श्वेताच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. यात एका चाहत्याने म्हटले की, “आम्ही तुझ्यावर प्रेम करतो सुशांत! माझ्या प्रत्येक श्वासात न्यायासाठी प्रार्थना,” अशी कमेंट केली आहे. तर एकाने “सुशांत तू अजूनही आमच्यासोबत आहे. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो,” अशी कमेंट केली आहे.
‘मी सारा खानच्या प्रेमात आहे…’, केआरकेचं ट्वीट पाहून अभिनेत्रीला बसला होता धक्का
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. त्याच्या आत्महत्येनं बॉलिवडूच नव्हे, तर सगळेच हादरले होते. त्याच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का होता. मात्र, त्यानंतर वेगवेगळे युक्तीवाद केले गेले. तसेच त्यांची हत्या करण्यात आल्याचंही म्हटलं गेलं. त्याच्या कुटुंबियांनीही या प्रकरणात दाखल केली. त्याच्या मृत्यूचं प्रकरण तापल्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.