टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. तिने मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर आईने तिचा बॉयफ्रेंड शिझानवर मानसिक छळ केल्याचे आरोप केले होते. तिच्या आईने शिझानविरोधात पोलिसांत तक्रारही दिली होती. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे गळफास घेऊन अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. तुनिषाच्या आत्महत्येनंतर अनेकांना सुशांतची आठवणही झाली आहे. अशातच सुशांतच्या बहिणीने तुनिषावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने तिच्या ट्विटमध्ये तुनिषा प्रकरणावर भाष्य केलं. तसेच हे प्रकरण तिला आत्महत्येचं वाटत नाही, असंही ती म्हणाली होती. “व्हॅनिटी व्हॅनमध्ये आत्महत्या कोण करतं? आणखी एक सुशांत सिंह राजपूत? काय होतंय कळत नाहीये. ती फक्त २० वर्षांची होती,” असं श्वेताने ट्वीटमध्ये म्हटलंय.
दरम्यान तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी ‘अलिबाबा’ शोच्या सेटवरच मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. बॉयफ्रेंड शिझान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर ती तणावात होती आणि त्यातूनच तिने हे पाऊल उचललं. तुनिषाने ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं होतं.