गेल्या वर्षभरापासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहते त्याला न्याय मिळवूण देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात बऱ्याचवेळा सुशांतची बहिण श्वेता कीर्ती सिंग सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करताना दिसते. दरम्यान, श्वेताने असा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा फोटो शेअर केला आहे. नेहमी सुशांतसाठी पोस्ट शेअर करणाऱ्या श्वेताने आता तिचा फोटो शेअर केला आहे. श्वेताने तिचा बीचवरचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्वेताने मरून रंगाचे ब्रालेट परिधान केले आहे. श्वेताचा हा बोल्ड फोटो पाहिल्यनंतर नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : लग्नानंतर अंकिताला पती विकीने भेट म्हणून दिलं ५० कोटींच ‘हे’ गिफ्ट

आणखी वाचा : निक जोनसची पत्नी असा उल्लेख केल्याने प्रियांका चोप्रा संतापली म्हणाली…

काही नेटकऱ्यांनी श्वेताला सुशांतची आठवण करून दिली आहे. तर काही नेटकऱ्यांनी श्वेताला असे फोटो शेअर न करता सुशांतच्या केसवर लक्ष देण्यास सांगितले आहे. दरम्यान, या आधी श्वेता अंकिताला लग्नासाठी शुभेच्छा दिल्यामुळे चर्चेत आली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajputs sister shared a bold photo netizens says do not post this kind of photos dcp