अमेरिकन रॅपर आणि गायक कान्ये वेस्टने १० जून रोजी त्याचा ४६ वा वाढदिवस अत्यंत थाटात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. या व्हिडीओमुळेच सध्या तो अडचणीत सापडला आहे. आपल्या या बर्थडे पार्टीमध्ये कान्ये वेस्टने घरात आलेल्या पाहुण्यांसाठी जपानी डिश सुशी (माशाचा एक प्रकार) एका नग्न महिलेच्या शरीरावर ठेवून सर्व्ह केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओची चर्चा होतच आहे पण याहून नेटकरी आणखी एका गोष्टीवर प्रचंड चिडले ते म्हणजे या पार्टीत कान्ये वेस्टची ९ वर्षांची मुलगी नॉर्थ वेस्टदेखील उपस्थित होती. एका नग्न महिलेच्या शरीरावर अशा प्रकारे अन्न ठेवून लोकांना दिल्याने सोशल मीडियावर कान्येचा निषेध करत आहेत, शिवाय आपल्या मुलीच्या उपस्थितीमध्ये त्याने हा असा प्रकार केल्याने त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

आणखी वाचा : तमिळ सुपरस्टार सूर्या करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; महाभारतातील ‘ही’ भूमिका साकारणार अभिनेता

जेव्हा या पार्टीतील व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा लोकांच्या हे ध्यानात आले की, बिकिनी घातलेली एक महिला टेबलावर निपचित पडली आहे. तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर सुशीने भरलेल्या प्लेट्स ठेवल्या आहेत. त्या ताटातून लोकं येऊन सुशी खात आहेत. ही एक जपानी प्रथा आहे ज्याला ‘न्योताईमोरी’ किंवा ‘बॉडी सुशी’ असंही म्हणतात. सर्वप्रथम एका महिलेला अशी वागणूक देणं हे स्त्रीविरोधी असल्याचं लोकांनी निदर्शनास आणून दिलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कान्येची पत्नी आणि मुलगीदेखील उपस्थित असल्याचं स्पष्ट झालं. नॉर्थ वेस्ट ही कान्ये आणि किम कार्दशियन यांची मुलगी आहे. चित्रविचित्र प्रकारची पार्टी आणि त्यातही लहान मुलीला पाहून नेटकरी कान्ये वेस्टवर प्रचंड खवळले आहेत. या संपूर्ण वादावर अद्याप कान्ये वेस्ट आणि त्याच्या परिवाराकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushi served to guest on naked women body in party of american rapper kanye west avn