अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सुष्मितानं तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं होतं. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. सुष्मिताच्या इन्स्टाग्राम पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. आताही असंच काहीस घडलं आहे. पुन्हा एकदा काही व्हायरल फोटोंमुळे सुष्मिता सेन सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या फोटोंमुळे सुष्मितानं तिसरं मुल दत्तक घेल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

सुष्मिता सेनचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये सुष्मिता, तिच्या मुली रेनी आणि अलिशा यांच्यासोबतच एका लहान मुलगा देखील दिसत आहे. हा व्हिडीओ सुष्मिताच्या घराच्या बाहेरील असल्याचं बोललं जात आहे. व्हिडीओमध्ये हे सर्वजण एकत्र खूप खूश दिसत आहे. सुष्मिता आणि तिच्या मुलांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण सुष्मितानं दोन मुलींनंतर तिसऱ्या मुलाला दत्तक घेतल्याचा अंदाज व्यक्त करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर सोशल मीडियावरून सुष्मिताचे चाहते देखील शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा

दरम्यान सुष्मिता सेननं यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच तिने कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नसल्यानं यामध्ये कितपत तथ्य आहे हे समजू शकलेलं नाही. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष सुष्मिताच्या प्रतिक्रियेकडेच लागून राहिलेलं आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटो आणि व्हिडीओमध्ये हा गोंडस मुलगा सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सुष्मिता सेन मागच्या काही वर्षांपासून एकल पालकत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. अद्याप अविवाहित असलेल्या सुष्मितानं २००० साली तिची मोठी मुलगी रेनी हिला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर २०१० साली तिनं अलिशाला दत्तक घेतलं. आपल्या दोन्ही मुलींसोबत सुष्मिताचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. त्याच्यासोबत व्हिडीओ आणि फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

Story img Loader