अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाहीयेत. दोघांनाही झियाना नावाची मुलगी असून नुकसाच तिचा पहिला वाढदिवस झाला. चारू आणि राजीवचं नातं घटस्फोटोपर्यंत पोहोचलं होतं, त्यानंतर दोघांनी मुलीसाठी घटस्फोटाचा निर्णय रद्द करत असल्याचं जाहीर केलं. पण पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. चारू असोपाने राजीववर तिची फसवणूक केल्याचा आरोप केलाय. तसेच त्याचे अफेअर असल्याचंही तिने म्हटलं होतं. भाऊ आणि वहिनीच्या विस्कटलेल्या नात्याबद्दल अद्याप सुश्मिताने कोणतंही भाष्य केलेलं नाही. पण सुश्मिताने नात्याबद्दल महत्त्वाचा सल्ला दिल्याचं चारूने सांगितलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘अल्लाह के बंदे’ गात प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास; कैलाश खेर यांनी शेअर केला व्हिडीओ

चारूने सिद्धार्थ कन्ननला एका मुलाखतीत सांगितले, “माझ्या जवळच्या मित्रांनी माझ्याशी बोलणं बंद केलंय, कारण मी राजीवपासून वेगळी होईल असं त्यांना वाटत नाही. दरवेळी वाद झाल्यानंतर आम्ही वेगळे होतो, पण मी नंतर परत त्याच्याजवळ जाते. आता मी माझ्या स्वतःच्या आईवर देखील विश्वास ठेवू शकत नाही, कारण मला तिची सर्वाधिक गरज असताना माझ्याबरोबर नव्हती.” यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये चारूने राजीववर शारीरिक अत्याचार आणि बाहेरख्यालीपणाचे आरोप केले होते.

हेही वाचा – नीना गुप्ता यांना करायचाय सलमान खानशी रोमान्स; म्हणाल्या, “मला त्याच्याबरोबर…”

सर्वजण दुरावले असले तरी आपण नणंद सुश्मिताच्या संपर्कात असल्याचं चारूने सांगिलं. सुश्मिताने मला इतर सर्व गोष्टींपेक्षा स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. “तिने मला पहिल्या दिवसापासून माझ्या स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देण्यास सांगितलंय. माझ्या पालकांनी मला राजीवबरोबरचे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं, पण दीदीने (सुश्मिता) कधीच नाही,” असं चारू म्हणाली.

हेही वाचा –अभिनेत्री हंसिका मोटवानीला आयफेल टॉवरसमोर प्रपोज करणारा सोहेल खातुरिया आहे तरी कोण?

पुढे ती म्हणाली, “मी सुश्मिताला माझ्या वैयक्तिक कारणांसाठी त्रास देत नाही, पण ती आमच्या कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे काही गोष्टी तिला कळतात. मला माझ्या सासऱ्यांनाही त्रास द्यायला आवडत नाही, त्यांचं वय झालंय आणि माझ्या सासूची तब्येत ठीक राहत नाही. पण जेव्हा जेव्हा सुश्मिताने मला फोन केला तेव्हा तिने मला स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. जर मी राजीवसोबत आनंदी असेल तर मी त्याच्याबरोबर राहायला हवं नाहीतर मी वेगळं व्हायला हवं, असा सल्ला तिने दिला,” असं चारूने सांगितलं.

हेही वाचा –उर्फी जावेदची ‘हाये ये मजबूरी’च्या ओरिजनल अभिनेत्रीशी भेट; म्हणाली, “दुसऱ्याच दिवशी शूटसाठी…”

दरम्यान, चारू आणि राजीव यांनी चार महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर २०१९मध्ये लग्नगाठ बांधली होती. पण दोघांचंही लग्न झाल्यापासून त्यांच्यात वाद सुरू आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen advise to charu asopa amid separation from rajeev sen hrc