बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे या दोघांच्या नात्यावर मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे या दोघांच्या नात्याची सुरुवात नेमकी कशी झाली याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असलेली दिसून येत आहे. अशातच या दोघांचं ९ वर्षांपूर्वीच ट्विटरवरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. यावरून या दोघांच्या नात्याची सुरुवात २०१३ पासून झाली होती असा अंदाज युजर्स लावताना दिसत आहेत.
ललित मोदी यांनी २०१३ साली सुष्मिता सेनला टॅग करून एक ट्वीट केलं होतं. यात ट्वीटला सुष्मिता सेननं उत्तरही दिलं होतं. ललित मोदी यांनी ९ वर्षांपूर्वीच आपल्या एका ट्वीटमध्ये सुष्मिता सेनला टॅग करून “माझ्या मेसेजचं उत्तर दे” असं म्हटलं होतं. त्यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. यावर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आणखी वाचा-ललित मोदी- सुष्मिता यांच्या नात्यावर भाऊ राजीव सेनची प्रतिक्रिया, म्हणाला…
अनेकांनी या ट्वीटचा संबंध ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या नात्याशी जोडला आहे. एका युजरनं या ट्वीटवर कमेंट करताना “या दोघांच्या नात्याची सुरुवात इथून झाली होती तर? काहीही होऊ शकतं आशा कधीच सोडू नये.” दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, “आशा सोडू नका” आणखी एका युजर्न लिहिलं, “चमत्कार खरे असतात.”
दरम्यान ललित मोदी यांनी सुश्मितासोबतचे काही फोटो शेअर करत एक ट्वीट केलं होतं. त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.” त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर सुष्मिताच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली होती मात्र त्यानंतर ललित मोदी यांनी आणखी एक ट्वीट करत या चर्चांना पूर्णविराम दिला. ज्यात त्यांनी, “अद्याप अद्याप आमचं लग्न झालेलं नाही तर फक्त एकमेकांना डेट करत आहोत” असं म्हटलं आहे.