बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर सातत्याने होताना दिसत आहेत. ललित मोदी यांनी सुश्मितासोबतचे रोमँटिक फोटो ट्विटरवर शेअर केल्यानंतर सुश्मिताला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आलं. काहींनी सुश्मिताला गोल्ड डिगरही म्हटलं आहे. तर काही लोक या नात्यामुळे हैराणही झाले आहे. सुश्मिताचे वडील आणि भाऊ यांनी देखील या नात्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर आता तिची वहिनी चारू असोपानं सुश्मिताच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेनची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा हिने सुश्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्यावर मौन सोडलं आहे. चारूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सुश्मिताला पाठिंबा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘द प्रॉब्लमेटिक कल्चर ऑफ कॉलिंग वुमन गोल्ड डिगर्स’ नावाचं एक आर्टिकल शेअर करताना चारूने लिहिलं, ‘खरंच, नेहमी मुलींवरच निशाणा साधला जातो. लोक एखाद्या मुलीला गोल्ड डिगर म्हणण्याआधी एकदा विचारही नाही करत. हे फारच दुःखद आहे.’ या सोबत तिने हृदय तुटलेला इमोजी देखील शेअर केला आहे.

ram kapoor praised rakhi sawant
ती मुंबईत 3 BHK सी फेसिंग बंगल्यात राहते; राखी सावंतबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “इंडस्ट्रीने तिचा गैरवापर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…

आणखी वाचा- सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपच्या कबुलीनंतर ललित मोदींनी इन्स्टाग्राम बायोमध्ये केला बदल, म्हणाले “नव्या जोडीदारासोबत…”

दरम्यान सुश्मितानं आपला भाऊ राजीवसोबतचे सर्व संबंध तोडल्याचं बोललं जातंय कारण तिने सोशल मीडियावर त्याला अनफॉलो केलं आहे. मात्र राजीवची पत्नी चारू असोपाला मात्र सोशल मीडियावर फॉलो करतेय. चारू आणि राजीवबद्दल बोलायचं तर त्यांच्याही नात्यात दुरावा आलाय. लवकरच दोघंही घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जातंय. मात्र सुश्मिता आणि चारू यांच्यात मात्र अद्याप चांगली मैत्री आहे.

आणखी वाचा- “मी ललित मोदीला जावई म्हणून…”, सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपवर वडिलांची पहिली प्रतिक्रिया

याआधी सुश्मिताचा भाऊ आणि वडील यांनी देखील सुश्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली होती. सुश्मिताच्या नात्याबद्दल राजीवला विचारल्यानंतर त्याने, “या नात्याबद्दल ऐकल्यानंतर मला देखील धक्का बसला होता. माझं अद्याप माझ्या बहिणीशी बोलणं झालं नाही. त्यामुळे मला याबद्दल काहीच माहिती नाही. पण मी तिच्यासाठी आनंदी आहे.” असं त्याने म्हटलं होतं.

Story img Loader