अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. नुकंतच या संपूर्ण प्रकरणावर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१०मध्येच सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. पण त्यावेळी दोघांनीही याबाबत मौन पाळणंच पसंत केलं. नुकंतच सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने पिंकविलाला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

ललित मोदी- सुष्मिता यांच्या नात्यावर भाऊ राजीव सेनची प्रतिक्रिया, म्हणाला…

त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “आपण त्यांच्यासाठी आनंदी राहायला हवे. प्रेम हे खूप सुंदर आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे की जर तिने एखाद्याला निवडलं असेल तर तो तिच्यासाठी पात्र असेल.”

दरम्यान रोहमन शॉल आणि सुष्मिताच्या रिलेशनशिपला २०१८मध्ये सुरुवात झाली. रोहमन सुष्मितापेक्षा १५ वर्षांनी लहान होता. ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रोहमनचे तिच्या दोन्ही मुलींसोबत फार छान बॉन्डिंग होते. मात्र अवघ्या तीन वर्षात म्हणजे २०२१ मध्ये रोहमन आणि सुष्मिताचा ब्रेकअप झाला. त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल जाहीर केले होते.

सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर रणवीर सिंगने दिली प्रतिक्रिया

तर दुसरीकडे उद्योजक ललित मोदी यांनी सुश्मितासोबतचे काही फोटो शेअर करत एक ट्वीट केलं होतं. “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही,” असं ट्वीट मोदी यांनी केलं होतं. या ट्वीटसोबत त्यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही फोटो शेअर केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen and lalit modi dating ex boyfriend rohman shawl first reaction on her relationship nrp