बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. तसेच रोहमन हा सुष्मिता सेनसोबत राहत होता. लवकरच ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. पण आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या आता सुष्मिता इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या वृत्ताला पुष्टी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता आणि रोहमन यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ई टाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, रोहमन आणि सुष्मिताने ब्रेकअप केला आहे. तसेच त्याने सुष्मिताचे घर सोडले असून एका मित्राच्या फ्लॅटवर तो शिफ्ट झाला आहे. आता सुष्मितानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, ‘आम्ही मैत्रीपासून सुरुवात केली होती आणि आम्ही शेवटपर्यंत मित्र राहू. नातं संपलं असलं तरीही प्रेम कायम राहील.’
आणखी वाचा : तुला रेंज रोवर कार आवडते का?; नोरा फतेही आणि सुकेश चंद्रशेखरचे पर्सनल चॅट व्हायरल

सुष्मिता आणि रोहमनच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना एका मुलाखतीमध्ये रोहमन म्हणाला होती की, ‘सुष्मिता, तिच्या मुली आणि मी एक कुटुंब आहे. कधी मी तिच्या मुलींचा वडील असतो तर कधी आमच्यामध्ये मैत्रीचे नाते असते. आमच्यामध्ये भांडणे देखील होतात. आम्ही एका कुटुंबासारखे राहतो. आम्ही एकत्र मजामस्ती करत असतो. त्यामुळे आम्ही अशा अफवांकडे फारसे लक्ष देत नाही.’

याच मुलाखतीमध्ये रोहमनला लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देत त्याने ‘जेव्हा आम्ही लग्न करु तेव्हा ते लपवून ठेवणार नाही. सध्या आम्ही आमच्या सीरिजच्या यशाचा आनंद घेत आहोत. नंतर या विषयी आम्ही नक्की विचार करु’ असे तो म्हणाला होता. पण आता रोहमन आणि सुष्मिता यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे समोर आले आहे.