बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती आजही बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सुष्मिता सेनचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे आणि ती नेहमी तिच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. आताही काहीसं घडलं आहे. सुष्मिता सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आहे.
सुष्मितानं वयाच्या २४ व्या वर्षीच एका मुलीला दत्तक घेतलं होतं. जिचं नाव रेनी आहे. त्यानंतर काही वर्षांनंतर तिनं दुसऱ्या मुलीला दत्तक घेतलं. सुष्मितानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं एक बिलबोर्डचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये सुष्मितानं मुलं दत्तक घेण्याबाबत आपले विचार मांडले आहेत.
आणखी वाचा- Video- जेव्हा ६ वर्षांनंतर आर्ची- परश्यानं ‘सैराट’चा ‘तो’ सीन केला रिक्रिएट, व्हिडीओ एकदा पाहाच
सुष्मितानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये असलेले बिलबोर्ड दिल्ली आणि मुंबईच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. ज्यावर ‘लग्न न करता मुलं कशी दत्तक घेऊ शकतेस?’ यासोबत #WhyTheBias असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना सुष्मितानं लिहिलं, ‘हे दिल्ली आणि मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. मी याआधी अनेकदा हे ऐकलं आहे. पण नंतर मी हे सर्व न ऐकण्याचा निर्णय घेतला.’ या फोटोसोबत सुष्मितानं #SingleMotherByChoice #WhyTheBias #ad हे हॅशटॅगही वापरले आहेत.
आणखी वाचा- नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’साठी अमिताभ बच्चन यांनी दिला होता नकार पण…
सुष्मिताच्या या पोस्टवर अनेक युजरनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. काही युजरनी सुष्मिता सर्वांसाठी प्रेरणा असल्याचं म्हटलं आहे. एका युजरनं तिच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘जेव्हा मी तुला पाहते, तेव्हा मला अभिमान आणि आदर वाटतो. एक दिवस मी तुझ्यासारखी होऊ इच्छिते.’ अशा आशयाच्या कमेंट करत सुष्मिताचं कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान सुष्मितानं २००० साली रेने आणि २०१० साली अलिशाला दत्तक घेतलं आहे.