अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुश्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. नंतर सुश्मिता सेनच्या या अफेअरवर अनेक मीम्स शेअर करण्यता आले आणि तिच्यावर टीका देखील झाली. अनेकांनी तिला गोल्ड डिगर म्हणजेच संपत्तीसाठी लोकांशी संबंध ठेवणारी म्हणत तिला ट्रोल केलं. या ट्रोलर्सना सुश्मिताने सडेसोड उत्तरही दिलं होतं.
सुश्मिता तिच्या बेधडक आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. लोकांची किंना सामाजाची तमा न बाळगता तिने कायमच उघडपणे तिच्या अफेअर्सची कबुली दिली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिने ललित मोदींसोबत असलेलं नातं हे तिचं खासगी आयुष्य असल्याचं म्हणत ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केलीय. तर दुसरीकडे सुश्मिताची मुलगी रेने हिने देखील आईच्या नात्याचा आदर करत तिला पाठिंबा दिला आहे.
हे देखील वाचा :खरंच दुसऱ्या लग्नाची तयारी करतोय हृतिक रोशन? वाचा नेमकं काय आहे सत्य
नुकताच सुश्मिताने तिच्या चाहत्यांसाठी एक फोटो शेअर केलाय. इन्स्टाग्रामवर तिने एक सेल्फी शेअर केलाय. यात तिने निळ्या रंगाचं टॉप परिधान केल्याचं दिसतंय. कारमधील हा सेल्फी पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “आठवण करून देते की तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते, फक्त तुमची” सुश्मिताच्या या पोस्टवर तिची मुलगी रेने हिने कमेंट केली आहे. “मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. विषय इथेच संपला.” असं रेने कमेंटमध्ये म्हणाली आहे.
सुश्मिताला काही नेटकरी ट्रोल करत असले तरी अनेक चाहते तिला पाठिंबा देत आहेत. एक युजर सुश्मिताच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, “धन्यवाद, तुम्ही माझी प्रेरणा आहात. लव यू मॅम” तर आणखी एक युजर म्हणाला, “अशीच असत रहा.”
दरम्यान ललित मोदी आणि सुष्मिता सेन बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची घट्ट मैत्री आहे. ते अनेकदा सोशल मीडियावर विविध फोटो व्हिडीओ शेअर करताना दिसतात. विशेष म्हणजे अनेकदा ते दोघे एकमेकांसाठीही पोस्ट शेअर करतात.