बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेअरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. ललित मोदींच्या अगोदर सुश्मिता सेन मॉडेल आणि अभिनेता रोहमन शॉलला डेट करत होती. ६ महिन्यांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. त्यामुळे आता सुश्मिताच्या नव्या अफेअरच्या चर्चांमध्ये रोहमनचं नावही घेतलं जातंय आणि आता रोहमनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो चाहत्यांना रिलेशनशिपबाबत सल्ला देताना दिसत आहे.

ललित मोदी यांनी सुश्मिता सेनला डेट करत असल्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावरून सुश्मितावर बरीच टीका करण्यात आली. एवढंच नाही तर तिला गोल्ड डिगर असंही म्हटलं गेलं. एकीकडे सुश्मिताला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असताना विक्रम भट्ट, महेश भट्ट, प्रियांका चोप्रा यांनी मात्र तिला पाठिंबा दिला. तर दुसरीकडे सोशल मीडिया युजर मात्र सुश्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलला पाठिंबा देताना दिसले. ६ महिन्यांपूर्वी रोहमन आणि सुश्मिताचा ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर आता ललित मोदी आणि सुश्मिता अफेअरनंतर रोहमननं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ बराच चर्चेत आहे.

आणखी वाचा- “…विषय इथेच संपला”, सुश्मिता सेनच्या पोस्टवर मुलगी रेनेची कमेंट

रोहमन या व्हिडीओमध्ये म्हणतोय, “मी #RohmanAsking मधील काही उत्तर वाचत होतो. हे सगळे लोक प्रेमात एवढे दु:खी का आहेत? तुम्ही सगळे तुमच्या जोडीदाराकडून एवढ्या जास्त अपेक्षा का ठेवता? म्हणजे तुमच्या जोडीदाराचं पण स्वतःचं एक आयुष्य आहे. त्यालाही त्याच्या आयुष्यात बरंच काही करायचं आहे. त्यामुळे जोडीदारावर अवलंबून राहणं सोडून द्या. स्वतःच स्वतःला खूश ठेवायला शिका. स्वतःला परफेक्ट बनवा. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करा. त्यानंतर जोडीदार शोधा. अशी व्यक्ती शोधू नका जी तुम्हाला पूर्णत्त्व देईल कारण असं कधीच होत नाही.”

View this post on Instagram

A post shared by rohman shawl (@rohmanshawl)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहमन या व्हिडीओमध्ये पुढे सांगतो, “एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला आणि तुमच्या आयुष्याला पूर्णत्त्व देईल ही संकल्पना मला अजिबात पटत नाही. तुमच्या स्वतःपेक्षा तुम्हाला कोणीच पूर्णत्त्व देऊ शकत नाही. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीमुळे तुम्ही कधीच परफेक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे दुःखी राहाणं, स्वतःला दोष देणं बंद करा. स्वतःच्या स्वर्थासाठी दुसऱ्यांची आयुष्य खराब करू नका. कोणीच तुमच्या आयुष्याची किंवा तुम्हाला आनंदी ठेवण्याची जबाबदारी घेतलेली नाही. फक्त तुम्हीच स्वतःला आनंदी ठेवू शकता. त्यामुळे जोडीदाराकडून अपेक्षा न ठेवता स्वतः आनंदी राहायला शिका.” दरम्यान या व्हिडीओनंतर रोहमनचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.