Sushmita Sen : ओटीटीवर सध्या एका अभिनेत्रीची प्रचंड चर्चा आहे आणि ती अभिनेत्री आहे सुश्मिता सेन. सुश्मिताने ताली या वेबसीरीजमध्ये काम केलं आहे. ही वेबसीरिज चांगलीच गाजते आहे. या सीरिजला अडीच कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. सुश्मिताच्या आर्या या सीरिजलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. अशात आता सुश्मिताचे फॅन्स पुन्हा एकदा खुश झाले आहेत. मात्र एक काळ असाही होता की सुश्मिताचे सीन सिनेमांमधून कापले जात असत. मात्र लोकांचं प्रेम इतकं होतं की सुश्मिताने यशस्वी कमबॅक केला. असाच एक किस्सा सुश्मिता सेनने एका मुलाखतीत सांगितला. हा सिनेमा बिग बजेट आणि मल्टिस्टारर होता. सिनेमाचं पोस्टर आलं तेव्हा त्यात सुश्मिता नव्हती. मात्र सिनेमा रिलिज झाल्यानंतर रातोरात सगळी पोस्टर्स बदलण्यात आली आणि अर्थात त्यात सुश्मिता होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे पण वाचा- ‘ताली’मधील सुव्रतच्या लूक टेस्टची सासूबाईंनी सांगितली गंमत; शुभांगी गोखले म्हणाल्या, “साडी आणि ब्लाउज…”

काय म्हटलं आहे सुश्मिता सेनने?

एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुश्मिता सेनने हा किस्सा सांगितला. “मै हूँ ना या सिनेमाचा फायनल कट पाहून मला फराह खानने फोन केला. ती म्हणाली तुझे काही प्रसंग कापले गेले आहेत. तुझ्या भूमिकेची लांबी कमी करण्यात आली आहे. यानंतर सिनेमाचा प्रीमियर शो झाला आणि मला यश चोपडांचा फोन आला. मी थोडी टेन्शनमध्ये होते पण मी त्यांचा फोन उचलला. तेव्हा ते मला म्हणाले की तू खूप छान काम केलं आहेस. माझे सीन कापण्यात आल्याचं दुःख या फोननंतर कुठल्या कुठे पळून गेलं.”

हे पण वाचा- Taali Review : मनाला न भिडणारी ‘ताली’

मै हूँ ना च्या पोस्टरचा किस्सा

मै हूँ ना चा अजून एक किस्सा सुश्मिताने सांगितला. ती म्हणाली, “सिनेमा रिलिज होण्याआधी जेव्हा या सिनेमाचे पोस्टर आले तेव्हा त्यावर झायेद खान, अमृता सिंह आणि शाहरुख खान हे तिघे होते. मात्र माझा रोल लोकांना आवडला. पहिल्याच दिवशी लोकांना माझं काम पसंत पडलं. ही जादू अशी चालली की सिनेमाच्या मेकर्सना रातोरात पोस्टर्स बदलावे लागले. गुरुवारपर्यंत मी पोस्टर्सवर नव्हते. मात्र शनिवारी जे पोस्टर आले त्यात फक्त शाहरुख आणि मी होते. मला असं वाटतं की हीच प्रेक्षकांची ताकद आहे. त्यांना जे आवडतं त्यामुळे मेकर्सनाही निर्णय बदलावा लागतो.” असं सुश्मिताने या मुलाखतीत म्हटलं आहे.