बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू झाली आहे. दीपिका-रणवीर सिंग पुढील आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहे. तर काही दिवसांनी प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनासही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा आहे. या चर्चांमध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ४२ वर्षीय सुष्मिता सेनही विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे सुश्मिता तिच्याहून १५ वर्षांनी लहान असलेल्या रोहमन शॉल या तिच्या बॉयफ्रेंडशी लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या सगळ्यावर सुश्मिताने स्वत: प्रतिक्रीया दिली आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपला वर्कआऊट करतानाचा व्हिडियो शेअर करत ती म्हणते, लोक जेव्हा तुमच्याबद्दल चर्चा करत असतात तेव्हा मी वर्कआऊट करत असते. हे सर्व गॉसिप बकवास आहे. आता माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. मी आयुष्याशी ‘रोहमान्स’ (रोमान्स) करत आहे असे सांगायलाही ती विसरलेली नाही. मला जे बोलायचे होते ते मी बोलले असेही ती शेवटी सांगते. वयाच्या अठराव्या वर्षी तिनं ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. तर वयाच्या २५ व्या वर्षी तिनं एका मुलीला दत्तक घेतलं. पंधरा वर्षांहून अधिक काळ झाला ती एकटीनं दोन्ही दत्तक घेतलेल्या मुलींचं संगोपन करत आहे. सुष्मिता अजूनही अविवाहित आहे.

सुष्मिता आणि रोहमन गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एका फॅशन इव्हेंटदरम्यान या दोघांचीही भेट झाली होती. रोहमन सध्या तिच्या दोन मुलींसोबतही वेळ घालवत आहेत. जर साऱ्या गोष्टी जुळून आल्या तर नक्कीच सुष्मिता नव्या आयुष्याला सुरूवात करेल अशी आशाही तिच्या जवळच्या व्यक्तीनं व्यक्त केली. यापूर्वी सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती, मात्र सुष्मिता रितिकचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

Story img Loader