बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर सातत्याने होताना दिसत आहेत. ललित मोदी यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडिया युजर्स या दोघांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. अनेकांनी सुष्मिताला गोल्ड डिगर देखील म्हटलं आहे. अशात आता या दोघांच्या नात्यावर राखी सावंतनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. राखीनं सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या अफेअरची खिल्ली उडवली आहे.

ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटीक फोटो शेअर करतानाच सुष्मिताला डेट करत असल्याचं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. या फोटोंमध्ये दोघांमधील जवळीक दिसून येत आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र नंतर त्यांनी पुन्हा एक ट्वीट करत लग्न झालेलं नाही आम्ही फक्त एकमेकांना डेट करत आहोत असं स्पष्टीकरण दिलं होतं.

आणखी वाचा- “मी ललित मोदीला जावई म्हणून…”, सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपवर वडिलांची पहिली प्रतिक्रिया

आता राखी सावंतनं या दोघांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. ललित मोदी आणि सुष्मिताच्या अफेअरबद्दल बोलताना राखी म्हणाली, “व्वा ललितची काय भारी काम केलं आहे. थेट सुष्मिता सेन. जेव्हा मी सुष्मिता सेन आण ललित मोदी यांचे फोटो पाहिले तेव्हा पहिल्यांदा मला दोघंही बाप-लेकीसारखे वाटले. सुष्मिता मिस युनिव्हर्स आणि ललित मोदी कोण आहेत काय माहीत.” असं म्हणत तिने या दोघांच्या अफेअरची खिल्ली उडवली आहे.

राखीच्या या बोलण्यावर पॅपाराजी तिला आठवण करून देतात की ललित मोदी तोच व्यक्ती आहे. जो पैसा घेऊन परदेशात पळून गेला होता. यावर राखी म्हणाली, “पैसे घेऊन पळून गेलात तर मोठ्या मोठ्या अभिनेत्री तर मिळतीलच. पैसा नसेल तर कणीच विचारत नाही. आजकाल कोणी बुद्धी आणि चेहरा पाहून प्रेम करत नाही. सर्वजण पैशाचा विचार करतात.” यासोबतच तिने सुष्मिताला शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader