बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन शनिवारी (१९ एप्रिल) संध्याकाळी मुंबईमध्ये स्माइल फाउंडेशनव्दारा आयोजित एका शोसाठी रॅम्पवर उतरली होती. सुष्मितासह तिची मुलगी रैनीसुध्दा रॅम्पवर दिसली. तसे या चॅरिटी शोमध्ये फक्त सुष्मिताच नव्हे तर, अनेक सेलेब्स आपला जलवा दाखविला.
सुष्मिता सेन, रैना, अमृता राव, सोनी राजदान (आलिया भट्टची आई), एवलिन शर्मा, कृष्णा लुल्ला, किर्ती सेनन, टायगर श्रॉफ, इजाबेल्ले लेटी, तनुज विरवानी, आदित्य सील, पायल रोहतगी, संग्राम सिंह, वीजे अँडी, शमा सिकंदर, शिल्पा अग्निहोत्री, हसलीन कौर, वीजे रमोनासह अनेक स्टार्स मुंबईमध्ये आयोजित या कार्यक्रमात पोहोचले होते.चॅरिटी शोमध्ये ‘पुरानी जीन्स’ चित्रपटातील कलाकार आदित्य सील, रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानी आणि इजाबेल्ले लेटीसुध्दा पोहोचले होते. यांच्याव्यतिरिक्त जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ आणि किर्ती सेनन हे स्टार्सही आपल्या ‘हीरोपंती’चे प्रमोशन करताना दिसले.

Story img Loader