बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेअरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. ललित मोदींच्या अगोदर सुश्मिता सेन मॉडेल आणि अभिनेता रोहमन शॉलला डेट करत होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. त्यामुळे आता सुश्मिताच्या नव्या अफेअरच्या चर्चांमध्ये रोहमनचं नावही घेतलं जातंय. मध्यंतरी रोहमनने सुश्मिताच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आता पुन्हा हे दोघं एकत्र दिसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “मला गोमांस खायला आवडतं” ‘बॉयकॉट ब्रम्हास्त्र’ दरम्यान रणबीर कपूरचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत

ललित मोदी यांनी सुश्मिता सेनला डेट करत असल्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावरून सुश्मितावर बरीच टीका करण्यात आली. एवढंच नाही तर तिला गोल्ड डिगर असंही म्हटलं गेलं. पण पुन्हा एकदा सुश्मिता आणि रोहमनच्या नात्यामध्ये जवळीक वाढत आहे की काय? असा प्रश्न त्यांचे एकत्रित फोटो आणि व्हिडीओ पाहून निर्माण होतो.

पाहा व्हिडीओ

सुश्मितासह तिची मोठी मुलगी रेने आणि रोहमन यांचे एकत्रित व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सुश्मिता, रेने आणि रोहमन हे खरेदीसाठी एकत्रित बाहेर गेले असता पापाराझी छायाचित्रकारांनी त्यांना घेरलं. त्यादरम्यानचे त्यांचे व्हिडीओ आणि फोटो पाहता नेटकऱ्यांनी देखील विविध चर्चा करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

सुश्मिताच्या दोन्ही मुली रेने आणि अलिशाबरोबर रोहमनचं घट्ट नातं आहे. सुश्मिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर देखील रोहमन तिच्या मुलींना भेटत असल्याचं बऱ्याच दिसून आलं. पण आता त्यांचे एकत्रित फोटो पाहून ललित मोदी कुठे गेले?, आता ललित मोदींचं काय? असे विविध प्रश्न नेटकरी विचारत आहेत.