प्रसिद्ध उद्योजक ललित मोदी यांच्याशी नातेसंबंधांमुळे सुश्मिता सेन सतत चर्चेत आहे. एकीकडे ललित मोदी बिनधास्त सुश्मितावरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सुश्मिता सेनने या प्रकरणावर अद्याप मौन बाळगलं आहे. तिने अनेकदा सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना अप्रत्यक्षपणे याबद्दल सांगत असली तरी तिने अद्याप ललित मोदीला डेट करण्याच्या वृत्ताला समर्थन दिलेलं नाही. पण त्यासोबतच हे वृत्त नाकारलेलं नाही. मात्र आता सुष्मिता सेन ही पुन्हा एकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलमुळे चर्चेत आली आहे. रोहमन शॉल आणि सुष्मिता सेनचे पुन्हा एकदा पॅचअप झाल्याचे बोललं जातं आहे.
सुष्मिताने नुकतंच तिची आई शुभ्रा सेन यांचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. या फॅमिली पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सुष्मिता तिची आई, मुली आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल दिसत आहेत. रोहमनचं सुष्मिता मुलींसोबत चांगलं बॉन्डिंग आहे आणि ते या व्हिडीओमध्येही स्पष्टपणे दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये रोहमन शॉल सुष्मिता सेनच्या मुलींसोबत मस्ती- मस्करी करताना दिसत आहे. सुष्मिता सेनचा हा व्हिडीओ लाइव्ह सेशनमधील आहे. हा व्हिडीओ पाहून सुष्मिताचे काही चाहते खूश आहेत, तर रोहमनला सुश्मिताच्या फॅमिली पार्टीमध्ये पाहून काहींच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर सुष्मिताने तिचं रोहमन शॉलशी ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून ललित मोदींशी असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत आहे. मात्र या व्हिडीओनंतर त्या दोघांचे पॅचअप झाल्याचे बोललं जात आहे.
त्यांच्या या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट करत पुन्हा पॅचअप झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप याबद्दल तिने याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही. दरम्यान सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या डेटिंगच्या वृत्तावर रोहमन शॉलनेही प्रतिक्रिया दिली होती. रोहमन शॉलने ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होतं, “त्यांना आनंदी राहू द्या, प्रेम ही एक सुंदर भावना आहे. मला इतकंच माहीत आहे की जर त्यांनी एकमेकांना निवडलं असेल तर ते एकमेकांना अनुरुप आहेत. एखाद्यावर हसून तुम्हाला आनंद मिळत असेल तर नक्कीच हसा. याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हाला त्रास होतोय. प्रेम पसरवा, द्वेष नाही.