अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली आहे. व्यावसायिक आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी (Lalit Modi) यांनी सुष्मिताला डेट करत असल्याचं काही दिवसांपूर्वीच जगजाहिर केलं. ललित यांनी सुष्मिता बरोबरचे फोटो शेअर करताच अनेकांच्या भूवया उंचावल्या. आता तर ते सुष्मिताच्या पोस्टवर कमेंट देखील करताना दिसतात.

आणखी वाचा – आधी गेटवरही उभं केलं नाही अन् नंतर…; शाहरुख खानच्या प्रोडक्शन कंपनीने संतोष जुवेकरला केला फोन, नेमकं काय घडलं?

सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्दीनिया व्हॅकेशन दरम्यानचा आहे. सुष्मिताने हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे न सांगता ललित यांनीच कमेंटच्या माध्यमातून याचा खुलासा केला आहे. यॉटमधून बाहेर येत समुद्रामध्ये पोहताना सुष्मिता यामध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सुष्मिताचा हा व्हिडीओ पाहून तू खूप सुंदर आहेस असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर ललित मोदी यांना देखील कमेंट करण्याचा मोह आवरला नाही. सुष्मिताच्या या व्हिडीओवर ललित यांनी केलेली कमेंट अधिक चर्चेत आली आहे. “सर्दीनियामध्ये तू हॉट दिसत आहेस.” असं ललित यांनी म्हटलं आहे. ललित यांच्या कमेंटनंतर पुन्हा एकदा दोघांचं नातं चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा – “दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकमेकींशी जमतं का?” प्रश्नावर अमृता फडणवीसांचं भन्नाट उत्तर

ललित मोदी यांनी “कुटुंबासोबत मालदीव, सर्दीनिया दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही,” असं ट्वीट करत सुष्मिताबरोबरचे फोटो शेअर केले होते. ललित यांच्या या नव्या कमेंटमुळे सुष्मिताच्या प्रेमामध्ये ते आकंठ बुडाले आहे असंच दिसतं.