बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सुश्मिता सेनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत तिला डेट करत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर एकीकडे सुश्मिताने तिचा भाऊ राजीव सेनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे राजीव आणि त्याची पत्नी चारू असोपा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या असताना सुश्मिता चारूला मात्र सोशल मीडियावर फॉलो करताना दिसते. यावर आता राजीव सेननं स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजीव सेन म्हणाला, “सुश्मिताने मला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचा दावा काही वृत्तांनी केला आहे. पण यामागचं सत्य वेगळंच आहे. खरं हेच आहे की सुश्मिताने मला इन्स्टाग्रामवर कधीच फॉलो केलं नव्हतं. ती नेहमीच मला ट्विटरवर फॉलो करते. ती मला इन्स्टाग्रामवर फॉलो करतच नव्हती तर अनफॉलो करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे अशा अफवा पसरवणं बंद करा.”

आणखी वाचा- महेश भट्ट यांचा सुश्मिता सेनला पाठिंबा, सांगितला भाऊ विक्रमसोबतच्या अफेअरचा किस्सा

राजीव पुढे म्हणाला, “काही वृत्तामध्ये सुश्मिता माझी पत्नी चारू असोपाला फॉलो करत असल्याच्या देखील चर्चा आहेत. असं करून ती चारूचं समर्थन करत असल्याचंही बोललं जात आहे. त्यावर मी फक्त एवढंच सांगेन की, माझी बहीण समजूतदार आहे. तिला माहीत आहे की आम्ही सगळे कुठे उभे आहोत. तसेच आता सर्वांनाच माहीत आहे की, माझी पत्नी किती सरळमार्गी आहे. ती विक्टम कार्ड खेळण्यात पटाईत आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen unfollow her bother rajiv sen on instagram know the truth here mrj