अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुष्मिताने बॉयफ्रेंड रोहमन शॉलशी ब्रेकअप झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. बिझनेसमन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी (Lalit Modi) यांनी गुरुवारी (१४ जुलै) संध्याकाळी एक ट्वीट करत सुष्मिता सेनला डेट करत असल्याची कबुली दिली. सुष्मिता आणि ललित यांच्या नात्याबाबत सध्या विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’मधील शेखरच्या पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष, म्हणाला, “५ वर्ष वाट पाहिली पण…”

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: दिल्लीत अजित पवार-शरद पवार भेट; युगेंद्र पवार म्हणतात, “एकत्र येण्यासाठी प्रयत्न…”
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Maharashtra Breaking News Updates
Maharashtra News : “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका”, उदय सामंतांचं वक्तव्य

२०१०मध्येच सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. पण त्यावेळी दोघांनीही याबाबत मौन पाळणंच पसंत केलं. दरम्यानच्या काळामध्ये सुष्मिता रोहमन शॉलला डेट करत होती. आता ललित यांनी सुष्मिताबरोबर असलेल्या नात्याची जाहिर कबुली दिल्यानंतर ललित-रोहमनला ती एकाचवेळी डेट करत होती का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, अलिकडच्या काळामध्येच ललित आणि सुष्मितामध्ये जवळीक वाढली. याआधी या दोघांमध्ये फक्त मैत्री होती. २०१८मध्ये ललित यांची पत्नी मिनल मोदी यांचं निधन झालं. ललित त्यांची पत्नी मिनल यांच्याबरोबर खूप खुश होते. इतकंच नव्हे तर ललित यांच्या पत्नीबरोबर सुष्मिताची चांगली मैत्री होती. मिनल यांच्या निधनानंतर ललित यांना एकटेपणा जाणवू लागला.

यादरम्यान सुष्मिताने देखील रोहमनशी ब्रेकअप केलं. रोहमनशी ब्रेकअप झाल्यानंतर ललित यांच्याबरोबर सुष्मिताची जवळीक वाढली असं बोललं जात आहे. सध्या तरी सुष्मिता-ललित एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच दोघं लग्न करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader