देशभरात करोनाची दुसरी लाट आली आहे. करोना पासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही लसीकरण करत आहे. त्यात अनेक सेलिब्रिटी तर सोशल मीडियावर त्यांच्या लसीकरणाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असल्याचे दिसत आहे. एवढंच नाही तर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ते त्यांच्या चाहत्यांना लसीकरण करण्याची विनंती करत आहेत. त्यात अभिनेता अर्सलन गोनीने सोशल मीडियावर लस घेतानाचा एक व्हिडीओ शेअर होता. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानच्या कमेंटने वेधलं आहे.

अर्सलनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो लस घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अर्सलने ‘व्हॅक्सिन घ्या’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी अनेक कमेंट करत त्याची स्तुती केली आहे. मात्र, सुझानच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सुझानने ‘सुपर’ अशी कमेंट करत त्याची स्तुती केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Arslan Goni (@arslangoni)

‘पिंकव्हिला’ने दिलेल्या वृत्तानुसार, “सुझान आणि अर्सलन हे फक्त मित्र नाही. तर, ते गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखत आहेत. टीव्ही जगतात त्यांच्या कॉमन फ्रेंड्समुळे ते भेटले. पण, अलीकडे ते दोघे थोडे जास्त जवळ आले आहेत. त्यांच्या देहबोलीवरून ते फक्त मित्रनाही असे स्पष्टपणे दिसते. अर्सलन आणि सुझान बऱ्याच वेळा त्यांच्या मित्रांसोबच एकत्र बसून वेळ घालवताना दिसतात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. सुझान आणि अर्सलनने त्याच्या नात्यावर अजून वक्तव्य केलेले नाही. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये मुख्य भूमिकत आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

Story img Loader