अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘वरवरचे वधू-वर’ नाटक सध्या रंगभूमीवर चांगलंच गाजत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णीने हे नाटक लिहिलं असून दिग्दर्शनही केलं आहे. या नाटकात सुव्रत आणि सखीसह अभिनेता सूरज पारसनीसदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच सुव्रत जोशीने ‘सवलत माझी लाडकी योजना’ प्रेक्षकांसाठी खास आणली आहे. ही योजना नेमकी काय आहे? जाणून घ्या…

अभिनेता सुव्रत जोशीने ‘सवलत माझी लाडकी योजना’ची घोषणा २३, ऑक्टोबरला जाहीर केली. एक व्हिडीओ शेअर करत ही नेमकी योजना काय आहे? हे सुव्रतने सांगितलं. या व्हिडीओत सुव्रत म्हणाला, “नमस्कार मी सुव्रत, आमचं नवीन नाटक ‘वरवरचे वधू-वर’ याला तुम्ही चांगलाच प्रतिसाद देतायत. येत्या २६ तारखेला पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात याचा रौप्य महोत्सव, २५वा प्रयोग दोन महिन्याच्या आतमध्ये होतोय. हे तुमच्या प्रेमामुळे शक्य झालंय. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या प्रयोगाला या. तो प्रयोग आपल्याला हाउसफुल्ल करायचा आहे.”

saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
ambani family drinks milk of this cow breed everyday
अंबानी कुटुंबीय ‘या’ गायीच्या दुधाचं करतात सेवन, मुंबई नव्हे तर ‘या’ भागातून मागवलं जातं दूध, किंमत किती?
Woman slaps Telugu actor NT Ramaswamy
Video: …अन् महिलेने भर गर्दीत अभिनेत्याला केली मारहाण, चित्रपट ठरला कारणीभूत; व्हिडीओ झाला व्हायरल
south star was first Indian to charge 1 crore per film
अमिताभ बच्चन, शाहरुख-सलमान खान नव्हे तर ‘हा’ आहे एक कोटी मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता
suriya move to mumbai with wife jyothika and children
‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य

हेही वाचा – Video: खुशबू तावडेच्या लेकीचा नामकरण सोहळा घरीच साध्या पद्धतीने पडला पार, तितीक्षाने व्हिडीओ केला शेअर

पुढे अभिनेता म्हणाला की, क्रमांक दोन, कला कलाकारखानची सुरुवात केल्यापासून म्हणजेच माझ्या निर्मिती संस्थेची सुरुवात केल्यापासून ‘अमर फोटो स्टुडिओ’च्या वेळी किंवा ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या वेळी माझं असं लक्षात आलंय की, एक मोठा तरुण वर्ग आमचं नाटक बघायला येतो. अनेकदा पहिलं मराठी नाटक बघायला लोक येतात ते आमचं नाटक असतं. याचा मला अतिशय आनंद आहे. याच वेळी मला याचीदेखील कल्पना आहे की, ५०० रुपयांचं तिकीट हे बऱ्याचशा मोठ्या तरुणवर्गाला महाग पडतं. त्यात खालची तिकीट ५०० रुपये असतात. नाटक पुढून बघायची इच्छा असते. याचसाठी मी नवीन एक योजना घेऊन आलो आहे. ते म्हणजे महिन्यातून एका आडवारी मी असा एक प्रयोग करायचा ठरवला आहे की, जेव्हा मी खालची तिकिटं ३०० रुपयांनी प्रेक्षकांसाठी उपलब्ध करतोय. याचा आस्वाद कॉलेजचे लोक किंवा कोणीही घेऊ शकतं. असं काही नाही की तुम्हाला कॉलेजचा आयडी दाखवायला पाहिजे.”

“याचा पहिला प्रयोग येत्या २८ तारखेला दुपारी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे करणार आहोत. या प्रयोगातील खालची बरीचशी तिकिट ३०० रुपयांनी विकायला काढली आहेत. ती तिकिट ऑनलाइन उपलब्ध आहेत. लवकरात लवकर ती तिकिट विकीत घ्या. तुमची वाट बघतोय. कॉलेजच्या ग्रुपने या आणि आनंद घ्या. थँक्यू, भेटूया. प्रेम,” असं सुव्रत म्हणाला.

हेही वाचा – Video : “बिग बॉस मराठीमध्ये तुला काय झालेलं?” निखिल दामलेचा जबरदस्त डान्स पाहून नेटकरी झाले थक्क, म्हणाले…

तसंच हा व्हिडीओ शेअर करत सुव्रत जोशीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ही कल्पना आवडली का? कॉलेज आणि इतर तरुण वर्गासाठी ही फायद्याची आहे का? तुमच्या शहरात ही योजना घेऊन येऊ का? शहराचे नाव कमेंटमध्ये लिहा.

सुव्रत जोशीचा व्हिडीओ पाहा

दरम्यान, ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाचं, नाटकातील कलाकारांचं आणि विराजस कुलकर्णीचं सर्वत्र खूप कौतुक होतं आहे. काही दिवसांपूर्वी सखीची आई आणि सुव्रतच्या सासू म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखलेंनीदेखील कौतुक केलं होतं.

Story img Loader