अभिनेता सुयश टिळक व अभिनेत्री अक्षया देवधर या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. या सर्व चर्चांवर सुयशने मौन सोडलं असून ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने नात्यावर भाष्य केलं.

सुयश आणि अक्षयाने कधीच आपल्या नात्याविषयी मोकळेपणाने कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावर दोघंही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली देताना दिसायचे. या दोघांनी आता सोशल मीडिया अकाऊंटवर एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुयश टिळक घराघरात पोहोचला. तर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत पाठकबाईंची भूमिका साकारणी अक्षय देवधर चांगलीच लोकप्रिय झाली.