अभिनेता सुयश टिळक हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सुयश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सुशय चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सुयशचे लाखो चाहते आहेत. आज सुयशने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सुयशचा साखरपुडा झाला आहे.
सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री आयुषी भावेसोबत सुयशचा साखरपुडा झाला आहे. या फोटोत सुयशने दाक्षिणात्य लोकांसारखे लुंगी आणि शर्ट परिधान केला आहे. तर, आयुषीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. आज आयुषीचा वाढदिवस असून त्याच निमित्ताने सुयशने हे फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो पाहताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या दोघांचा साखरपुडा झाला असला तरी सनई- चौघडे कधी वाजणार असा प्रश्न आता चाहत्यांसमोर आहे.
आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल
View this post on Instagram
हे फोटो शेअर करत “ही स्त्री माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी सुंदर बनवते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुषी. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी भाग्यवान माणूस आहे की मला अशी जीवनसाथी मिळाली…ही बातमी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला मला आनंद होतं आहे की, आता आमचा साखरपुडा झाला आहे. आम्ही एकत्र एक नवीन प्रवास सुरु करणार आहोत,” अशा आशयाचे कॅप्शन सुयशने दिले आहे.
आणखी वाचा : Video : बाळासाहेबांनंतर जर कोणी नेता आहे तर राजसाहेब ठाकरे – हिंदुस्तानी भाऊ
View this post on Instagram
आयुषी ही अभिनेत्री आणि एक उत्तम डान्सर आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये आयुषी झळकली होती. आता लवकरच आयुषी ‘या गावाचं की त्या गावाचं’ या चित्रपटात दिसणार आहे. आयुषी सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.