ह्रतिक रोशन आणि सुझ्ॉन या पती-पत्नींचा एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय त्या दोघांचीही मनस्थिती बिघडवून ठरला आहे. सुझ्ॉनने वेगळे व्हायचा निर्णय घेतल्यानंतर ह्रतिकच्या जीवनावर त्याचा बराच परिणाम झाला आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर तो झगडतो आहे. सध्या बॉलिवूडमधील त्याचे सहकारी त्याला या ना त्या तऱ्हेने या मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहेत. ह्रतिकसारखीच सुझ्ॉनही सध्या तणावग्रस्त आयुष्य जगत असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे ते दोघेही पुन्हा एकत्र येतील आणि नव्याने आयुष्य सुरूवात करणार, अशी चर्चा जोर धरते आहे.
ह्रतिकची मनस्थिती वाईट असली तरी त्याने निदान स्वत:ला आपल्या चित्रपटांच्या कामात गुंतवून घेतले आहे. तो त्यानंतरही कित्येक वेळा आपल्या दोन्ही मुलांबरोबर वेळ घालवताना दिसला. मात्र, सुझ्ॉन त्यांच्याबरोबर कुठेच नव्हती. सुझ्ॉनने स्वत:ला घरात बंदिस्त करून घेतले आहे. सध्या ती कोणत्याही जाहिर कार्यक्रमांना हजर नसते. मध्यंतरी, सुझ्ॉन तिची बहीण सिमॉन खानच्या वाढदिवसासाठीही उपस्थित राहिली नव्हती. आपल्याच निर्णयाचा तिला मनस्ताप झाला असल्याचे बोलले जात आहे.
या सगळ्या परिस्थितीत ह्रतिक आणि सुझ्ॉन पुन्हा एकत्र येण्याच्या मनस्थितीत आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून बोलले जात आहे. ह्रतिकने दिलेल्या निवेदनानुसार वेगळे व्हायचा निर्णय हा सुझ्ॉनने घेतला होता. त्यामुळे आता एकत्र येण्याचा निर्णयही तिच्याकडूनच येईल, असे त्यांच्या मित्रमंडळींचे म्हणणे असून ही चांगली गोष्ट लवकरात लवकर घडावी. आणि बॉलिवूडचे हे आदर्श जोडपं पुन्हा एकत्र यावं, अशी इच्छा त्यांचा मित्रपरिवार करतो आहे.

Story img Loader