माजी इंडियन आयडॉलची स्पर्धक मोनाली ठाकूर ही तिच्या संगीत विश्वातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती नागेश कुकुनूरच्या ‘लक्ष्मी’ आणि अब्बास टायरवाल्याच्या ‘मॅंगो’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत येत आहे. ‘रेस’मधील ‘जरा जरा टच मी’ आणि आगामी चित्रपट ‘लुटेरा’मध्ये ‘सवार लू’ यांसारखी हिट गाणी मोनालीने गायली आहेत. ” मी एक गायिका असले तरी मला नृत्य करण्यास आवडते. संगीत, अभिनय आणि नृत्य हे एकमेकांना जोडले गेले असल्याचे,” मोनालीला वाटते असे ती म्हणाली.
‘लक्ष्मी’ या चित्रपटात तिने बाल वेश्येची भूमिका केली आहे. एका मुलीला वेश्याव्यसायासाठी करण्यात आलेली सक्ती यातून दाखविण्यात आली आहे. अनेक सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाची कथा असल्याचे मोनालीने सांगितले.
मोनाली अब्बास टायरवाल्याच्या ‘मॅगो’ चित्रपटातही दिसणार असून हा एक रोमॅंण्टिक विनोदी चित्रपट आहे. गोव्यात चित्रीकरण होत असलेल्या या चित्रपटात पाच व्यक्तिंच्या जीवनावरील एक रात्र चित्रीत करण्यात आली आहे.

Story img Loader