गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांतून वेगवेगळे विषय हाताळले जात असून आगामी ‘डब्बा गूल’ या चित्रपटातून एक वेगळाच विषय हाताळला जाणार आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीतील भ्रष्टाचार हा या चित्रपटाचा विषय आहे. तर ‘लेट्स चेंज’ या आगामी हिंदी चित्रपटाची कथा स्वच्छता अभियान या विषयाभोवती गुंफण्यात आली आहे.
रमेश देव प्रॉडक्शन व अपार एन्टरटेन्मेंटतर्फे या चित्रपटांची निर्मिती करण्यात येत असून दोन्ही चित्रपटांचा मुहूर्त नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका कार्यक्रमात झाला. हो दोन्ही चित्रपट स्वच्छता या विषयाबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतील, असा विश्वास फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.‘डब्बा गूल’ मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीतील भ्रष्टाचार, स्वच्छता अभियान आणि भ्रष्टाचार यावर प्रकाश टाकला जाणार आहे. दोन पत्रकारांच्या माध्यमातून ही कथा सादर केली जाणार आहे, असे रमेश देव यांनी या वेळी सांगितले.‘लेट्स चेंज’ या चित्रपटात स्वच्छता अभियान हा विषय हाताळण्यात आला आहे. काही विद्यार्थी अशा प्रकारची मोहीम आयोजित करतात आणि त्याचे चांगले परिणाम परिसरात दिसून येतात, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक रोहित आर्य यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा