मराठी साम्राज्याचा झेंडा अटकेपार लावला तो शूर, पराक्रमी, रणधुरंधर पेशव्यांनी. रणांगणामध्ये युध्द जिंकण्याचा निश्चय, शौर्य, उत्तम रणनीती यामुळे पेशव्यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करत मराठा साम्राज्य चोहीकडे पसरवले. या सगळ्यांमध्ये पेशवाईचा आधारस्तंभ ठरल्या, घरातील ‘स्त्रिया’. स्त्रियांचे पेशव्यांच्या कारभारात, राजकारणात, निर्णयात प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या नेहमीच सहभाग असे. महाराष्ट्राचा इतिहास साक्षी आहे, प्रत्येक यशस्वी थोर पुरुषामागे स्त्रीचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पेशव्यांच्या काळात एक पतिव्रता, एकनिष्ठ स्वामिनी होऊन गेली ती म्हणजेच माधवरावांची रमा… त्या काळात पेशव्यांचा ‘मानबिंदू’ म्हणून ओळखला जाणारा शनिवारवाडा साक्षी ठरला एका विलक्षण प्रेमकहाणीचा… माधव आणि रमाचे लग्न संपूर्ण पेशवाईला एक वेगळी कलाटणी देणारे ठरले. सत्ता आणि संसार, कौटुंबिक कलह, कटकारस्थानं, राजकारणी डावपेच यामध्ये रमा माधवरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी. मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
पेशव्यांची ‘स्वामिनी’ येत आहे मराठी मनावर अधिराज्य गाजवायला
पेशव्यांच्या काळात एक पतिव्रता, एकनिष्ठ स्वामिनी होऊन गेली ती म्हणजेच माधवरावांची रमा...
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-09-2019 at 11:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swamini new marathi serial on rama madhav on colors marathi ssv