चित्रवाणी आणि रूपेरी पडद्यावर ‘केमिस्ट्री जुळण्या’साठी प्रसिद्ध असलेली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही सुपरहीट जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटातून मुक्ता-स्वप्नीलची ‘केमिस्ट्री’ पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.
मूळच्या पुण्याच्या परंतु तेलुगू चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री रेणू देसाई प्रथमच या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत असून समीर हेमंत जोशी यांनी लेखन-दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘दुनियादारी’ या सुपरडूपरहिट चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर संजय जाधव पुन्हा एकदा छायालेखनाकडे वळले आहेत. मुख्य भूमिकेतील स्वप्नील-मुक्ता यांच्या व्यतिरिक्त सई ताम्हणकर, कादंबरी कदम, हेमंत ढोमे या कलावंतांच्याही भूमिका आहेत. नीलेश मोहरीर यांचे संगीत असून गुरू ठाकूर यांची गाणी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi and mukta barve jodi again on screen