मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनेता स्वप्नील जोशीला याला गोड बातमी मिळाली आहे. स्वप्नील जोशीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. सोमवारी रात्री स्वप्नीलची पत्नी लीनाने मुलीला जन्म दिला. स्वप्नीलच्या घरी आलेल्या या छोट्या परीमुळे जोशी कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
स्वप्नीलसाठी यंदाचे वर्ष खूप खास आहे. संजय लीला भन्साळी प्रोडक्शनच्या लाल इश्क चित्रपटात स्वप्नील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट त्याच्यासाठी महत्त्वाचा असून, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला गोड बातमी मिळाल्याने स्वप्नील खूश आहे.

Story img Loader