अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. त्याची नवी मालिका ‘तू तेव्हा तशी’ काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अलिकडेच या मालिकेतील कलकारांनी ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर हजेरी लावली आणि यावेळी स्वप्नील जोशीनं त्याच्या महिन्याभराच्या खर्चाबाबत एक खूपच रंजक किस्सा सर्वांसोबत शेअर केला. सर्वांनी ऐकून आश्चर्य वाटेल पण स्वप्नीलनं सांगितलं की त्याला त्याच्या खर्चासाठी आजही आई- बाबांकडून पॉकेटमनी दिला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘किचन कल्लाकार’च्या मंचावर एका टास्कच्या वेळी स्वप्नीलनं हा किस्सा शेअर केला. या मंचावर ‘तू तेव्हा तशी’च्या कलाकारांना एक प्रश्न विचारला गेला होता की, ‘स्वप्नील खूप उधळपट्टी करतो’ हे खरं आहे की खोटं. यावर कलाकारांनी खरं आणि खोटं अशी दोन्ही उत्तरं दिली. मात्र यावर स्वप्नीलनं स्वतः सांगितलं की, ‘हे खोटं आहे कारण, मला आजही आई-वडिलांकडून पॉकेटमनी मिळतो.’

आणखी वाचा- The Kashmir Files बद्दल प्रश्न विचारल्यानं पत्रकारावर भडकला जॉन अब्राहम, म्हणाला…

स्वप्नील पुढे म्हणाला, ‘मी जे काही पैसे कमावतो ते माझ्या आई- वडिलांकडे जातात आणि त्यातून ते मला महिन्याभराच्या खर्चासाठी काही रक्कम देतात. त्यानंतर जेव्हा माझ्याकडे पैसे संपतात आणि मला अतिरिक्त पैशांची गरज असते तेव्हा मला माझ्या आई- बाबांना आतापर्यंत झालेल्या खर्चाचा हिशोब द्यावा लागतो आणि जर एखाद्या खर्चाचा हिशोब मी देऊ शकत नसेन तर मग तो अवाजवी आहे असा त्याचा अर्थ होतो. जर मी दिलेला खर्चाचा हिशोब आई- बाबांना मान्य असेल तर ठीक पण जर ज्यांना तो मान्य नसेल तर मात्र मला माझ्याकडे उरलेल्या पैशातच उरलेला महिना काढावा लागतो.’

आणखी वाचा- सलमान- सोमीच्या ब्रेकअपचं काय होतं नेमकं कारण? तब्बल २३ वर्षांनंतर अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

दरम्यान स्वप्नील जोशी सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी सोबत या मालिकेत शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकेत आहे. सध्या स्वप्नील झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा देखील एक अविभाज्य हिस्सा आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi reveal that he still getting pocket money by his parents for monthly expense mrj