बदलते लूक आणि आपल्या स्टाईल स्टेटमेन्टने आजच्या तरुणाईला भुरळ घालणारे अनेक बॉलीवूड कलाकार  आपण पाहतो. कंगना रणौत, दीपिका पदुकोण, सलमान खान, हृतिक रोशन आणि अनेक कलाकारांनी स्वतःचे फॅशन कलेक्शन त्यांच्या चाहत्यांसाठी सुरु केले आहे. या नावांमध्ये आता एका मराठी कलाकाराचे नावही जोडले गेले आहे. मराठीतील आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीचे ‘एस. जे. कलेक्शन’ चाहत्यांसाठी खुले करण्यात आले आहे.
फॅशनची आवड असणा-या आजच्या तरुणाईसाठी ‘स्वप्निल रेकमेंड्स लूक बुक’चे मालाड येथील इन्फीनिटी मॉलच्या मॅक्स स्टोअरमध्ये अनावरण करण्यात आले. स्वप्नीलने सुचवलेले कलेक्शन मॅक्सच्या सर्व स्टोअरमध्ये आता चाहत्यांसाठी खुले करण्यात आले आहेत. यासाठी एक स्पर्धाही घेण्यात आली होती. त्यात विजयी झालेल्या स्पर्धकांना स्वप्निलने हस्ताक्षर केलेले  ‘लुक- बुक’ आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी मिळाली.  चाहत्यांना आपले कलेक्शन उपलब्ध करून देणारा स्वप्नील हा पहिलाच मराठी अभिनेता ठरला आहे. हे कलेक्शन मुंबई, पुणे आणि  नागपूर मधल्या मॅक्सच्या स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा