वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्करने दिल्लीतील वसंत कुंजमधील पोलीस ठाण्यात एका सोशल मीडिया युजर विरोधात तक्रार केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वरा भास्करच्या एका जुन्या सिनेमातील सीन एका युजरने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या सिनेमामुळे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप स्वराने या युजरवर केलाय. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यूट्यूब आणि ट्वीटरवरील एका युजरने अभिनेत्रीची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल केल्या आहेत. या प्रकरणी कलम 354 डी आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वरा भास्करने नुकतच एक ट्वीट करत या बद्दलची माहिती दिली होती. “आणि माझ्या मित्र हा एका प्रकारचा सायबर लैंगिक छळ आहे. सार्वजनिक क्षेत्रात महिलांना येणाऱ्या आव्हानांबद्दल बोलूया का?प्रिय ट्विटर इंडिया… चला महिलांसाठी हे प्लॅटफॉर्म सुरक्षित कसं बनवता येईल यावर चर्चा करुया.” अशा आशयाचं ट्वीट करत स्वराने युजरने शेअर केलेल्या काही ट्वीटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

स्वरा भास्करचा ‘वीरे दे वेडिंग’ या सिनेमातील एक सीन व्हायरल करण्यात आलाय आहे. हस्तमैथुन करतानाच्या या सीनवरून तिला लक्ष्य करण्यात आलं आहे आणि सोशल मीडियावर हॅशटॅग करुन तो सीन व्हायरल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत स्वरा भास्करने सेलिब्रिटींमध्ये तिला सर्वात जास्त सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्यचा खुलासा केला होता.