अभिनेता रणवीर सिंह हा कायमच त्याच्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. पण आता रणवीर सिंग हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच रणवीरच्या या न्यूड फोटोशूटवर अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे.
रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी करण्यात आलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडा दिसत नाही. यावेळी रणवीरने बोल्ड पोजही दिली आहे. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले आहेत. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे.
रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “हे फोटो पोस्ट करण्यापूर्वी…”
रणवीरच्या या लूकवर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री स्वरा भास्कर यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना तिने रणवीरला ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच तिने रणवीरचे समर्थनही केले आहे. स्वरा भास्करने नुकतंच तिच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावर तिने याबद्दल वक्तव्य केले आहे.
“आपल्या देशात अन्याय आणि छळ होण्याची प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. पण तरीही सर्वांचे लक्ष हे रणवीर सिंगच्या फोटोशूटवर आहे. जर तुम्हाला त्याचे फोटो आवडत नसतील तर तुम्ही ते पाहू नका. हा तुमचा चहाचा कप नाही, तुम्हाला नको असेल तर तो पिऊ नका. पण तुमची निवड आमच्यावर लादू नका. तसेच हा एखादा नैतिक मुद्दाही नाही, असे स्वरा भास्करने ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान रणवीरने बर्ट रेनॉल्डच्या सन्मानार्थ पेपर मासिकासाठी हे फोटोशूट केलं आहे. डाएट सब्या नावाच्या एका अधिकृत इस्टाग्राम पेजवरुन रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. याचसोबतच रणवीरच्या मुलाखतीमधील काही वाक्यंही यासोबत शेअर करण्यात आली आहे. “मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. मला चांगले कपडे घालायला, छान छान खायला आवडतं. मी दिवसातील २० तास काम करतो पण कधीच याबाबत तक्रार करत नाही. मी या सर्व गोष्टींसाठी फार आभारी आणि कृतज्ञ आहे. मात्र यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागलेत. मी आज ‘गुची’ सारख्या ब्रॅण्डचे कपडे घेऊन डोक्यापासून पायापर्यंत सर्व काही ब्रॅण्डेड वापरु शकतो. तरीही यावरुन कोणी माझ्याबद्दल उलटसुटल बोलत असेल तर त्याची मी पर्वा करत नाही,” असं रणवीरने म्हटलं आहे.