वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री स्वरा भास्कर कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. तर सोशल मीडियावरून नेटकऱ्यांशी पंगा घेण्यात स्वरादेखील मागे हटत नाही. ट्रोल करणाऱ्यांना स्वरा सडेतोड उत्तर देत असते. नुकतेच स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यातील स्वराच्या लूकवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.
स्वराने इन्स्टाग्रामवर काळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. स्वराने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसवर शोल्डला चंदेरी रंगाचं वर्क आहे. तर ड्रेसच्या मागील बाजूने स्लीट असल्याचं दिसतंय. तिच्या या हटके ड्रेसवर अनेकांनी कमेंट करत स्वराने उलटा ब्लेझर परिधान केल्याच्या कमेंट केल्या आहेत.
जिनिलियाला ‘निर्लज्ज, अश्लील काकू’ म्हणणाऱ्या युजरला रितेश देशमुखचं उत्तर, म्हणाला “त्याला खरोखरच…”
KBC 13: जेव्हा बिग बींना विनातिकीट प्रवास करताना टीसीने पकडलं होतं; शेअर केला धमाल किस्सा
स्वराने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “लोक म्हणतात जर तुम्ही पावरफुल असाल तर जे हवं ते करू शकता. आम्ही देखील केलं, जसं ब्लेझरला ड्रेसमध्ये बदलणं” स्वराच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, “कुछ तो गडबड है दया, डिझायनर सटकलेला आहे, बदला त्याला.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “असं वाटतं हिच्यावर रणवीर सिंहचं भूत चढलंय, कोट तर सरळ घातला असतास”
स्वराने पुण्यातील एका अवॉर्ड सेरेमनीसाठी हा खास लूक केला होता. या काळ्या ड्रेसवर तिने बूटस् घातले होते. तर खास लूकमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.